उत्तराताई कलबुर्गे यांचा सत्कार — भाजपा महिला मोर्चा जिल्हाध्यक्षपदी तिसऱ्यांदा निवड

0
उत्तराताई कलबुर्गे यांचा सत्कार — भाजपा महिला मोर्चा जिल्हाध्यक्षपदी तिसऱ्यांदा निवड

सोमनाथपूर (एल पी उगीले) भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा जिल्हाध्यक्षपदी उत्तराताई कलबुर्गे यांची तिसऱ्यांदा निवड झाल्याबद्दल हाळी हंडरगुळी मंडळाच्या तालुकाध्यक्षा शिवकर्णा अंधारे यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात त्यांचा उत्साहात सत्कार करण्यात आला. या प्रसंगी सरोज वारकरे,श्यामल कारामुंगे, उषा माने, शिवगंगा बिरादार, रेणुका डुबूकवाड, रंजना घंटे, सुरेखा केंद्रे, अनिता वाडीकर, विविध महिला पदाधिकारी, कार्यकर्त्या तसेच भाजप नेत्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
कार्यक्रमात तालुकाध्यक्षा शिवकर्णा अंधारे यांनी सांगितले की, “उत्तराताई कलबुर्गे यांनी महिला मोर्चाच्या कार्यात नेहमीच सक्रिय नेतृत्व दाखवले असून त्यांच्या तिसऱ्या कार्यकाळात महिला सक्षमीकरणासाठी परिणामकारक उपक्रम राबवले जातील,” असे मत व्यक्त करण्यात आले.
सत्कार सोहळ्यात पुष्पगुच्छ, शाल-श्रीफळ देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. उत्तराताईंनी कार्यकर्त्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करत सांगितले की, पक्षश्रेष्ठींनी माझ्यावर दाखवलेला विश्वास सार्थ करून दाखवेन, पक्ष संघटन बांधणीमध्ये महिलांचा सिंहाचा वाटा राहिला पाहिजे, ज्या पद्धतीने समाजाच्या जडणघडणीसाठी महिलांचे नेतृत्व गरजेचे आहे त्याच पद्धतीने राजकारणामध्ये देखील पक्ष संघटन मजबूत होण्यासाठी महिला नेतृत्व निर्माण करणे गरजेचे आहे. पक्षश्रेष्ठींनी तिसऱ्यांदा ही जबाबदारी माझ्यावर दिली आहे, याचे गांभीर्य विचारात घेऊन मी सकारात्मक आणि अधिकाधिक जनतेपर्यंत पक्षाची ध्येय धोरणे पोहोचवण्याच्या दृष्टीने काम करणार आहेत.पक्षाच्या विचारधारेनुसार महिलांच्या प्रगतीसाठी आणि संघटन विस्तारासाठी मी सदैव कार्यरत राहीन. लातूर जिल्ह्यातील महिला कार्यकर्त्यांनी मला सतत सहकार्य केले आहे. माझ्या हाकेला ओ देऊन प्रत्येक कार्यक्रमासाठी आणि विविध समाज उपयोगी उपक्रम राबवण्यासाठी पुढाकार घेतलेला आहे. याची जाणीव मला आहे. प्रत्येक कार्यकर्त्याचा सन्मान हेच धोरण ठेवून आपण काम करू, राष्ट्र सर्वप्रथम हे धोरण ठेवून देश हितासाठी जे जे करता येईल ते ते करण्यासाठी सदैव तत्पर राहू. असेही उत्तरातही कलबुर्गे यांनी याप्रसंगी सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन संयोजिका शिवकर्णा अंधारे यांनी केले. श्रीमती उत्तरा कलबुर्गे यांच्या स्वागत समारोहासाठी परिसरातील भाजप कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!