महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात करिअर मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन, विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

0
महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात करिअर मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन, विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

उदगीर (प्रतिनिधी)महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालय, उदगीर येथील वाणिज्य व अर्थशास्त्र विभागाच्या वतीने करिअर मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात शंभरहून अधिक विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. कार्यक्रमात कंपनी सेक्रेटरी या व्यावसायिक अभ्यासक्रमाबाबत विद्यार्थ्यांना सविस्तर माहिती देण्यात आली. “कंपनी सेक्रेटरी — अ करिअर विथ एंडलेस अपॉर्च्युनिटीज” या विषयावर कंपनी सेक्रेटरी निखिल गुजलवार यांनी विद्यार्थ्यांना या क्षेत्रातील शैक्षणिक तसेच व्यावसायिक संधींचे मार्गदर्शन केले. कार्यक्रमास अर्थशास्त्र विभागप्रमुख डॉ. संतोष मुळे, वाणिज्य विभागप्रमुख डॉ. बालाजी होकरणे, कनिष्ठ महाविद्यालय वाणिज्य विभागप्रमुख सगर सर, प्राध्यापकवृंद व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या मार्गदर्शन सत्रातून विद्यार्थ्यांना योग्य करिअर दिशा मिळावी तसेच स्पर्धात्मक परीक्षांसाठी तयारी करण्याची प्रेरणा मिळाली.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!