‘हैदराबाद गॅझेटमध्ये राजुरचा उल्लेख, यापेक्षा मोठा पुरावा नाही!’ – ॲड. स्वप्निल व्हत्ते यांचे प्रतिपादन; ऐतिहासिक ‘राजूर’ नामकरणासाठी १०,२०० निवेदनांसह उपजिल्हाधिकाऱ्यांकडे साकडे

0
'हैदराबाद गॅझेटमध्ये राजुरचा उल्लेख, यापेक्षा मोठा पुरावा नाही!' - ॲड. स्वप्निल व्हत्ते यांचे प्रतिपादन; ऐतिहासिक 'राजूर' नामकरणासाठी १०,२०० निवेदनांसह उपजिल्हाधिकाऱ्यांकडे साकडे

​अहमदपूर ( गोविंद काळे )
​अहमदपूर शहराचे नाव बदलून ते पूर्ववत ‘राजूर’ करावे, या ऐतिहासिक मागणीने आज (दिनांक १० ऑक्टोबर २०२५) पुन्हा जोर धरला. गीतासार सेवाभावी संस्था, अहमदपूर यांच्या वतीने तब्बल १० हजार २०० निवेदनांसह मागणीचे पत्र मा. उपजिल्हाधिकारी यांच्याकडे सादर करण्यात आले.
​ॲड. स्वप्निल व्हत्ते यांनी यावेळी पत्रकारांशी बोलताना या मागणीच्या समर्थनार्थ अत्यंत महत्त्वाचा ऐतिहासिक पुरावा सादर केला. ते म्हणाले, “मराठा आरक्षणासाठी सादर केलेल्या हैदराबाद गॅझेटमध्ये ‘राजुर वरवाळ’ चा उल्लेख सातत्याने येतो. या ऐतिहासिक नोंदीपेक्षा राजुर या नावाचा दुसरा कोणताही मोठा पुरावा असू शकत नाही.” व्हत्ते यांनी सध्याच्या गाव नकाशातही ‘कसबा राजुर’ असा उल्लेख सापडत असल्याचे स्पष्ट केले.
​निजाम शासकाने पुत्रप्राप्तीनंतर मूळ ‘राजूर वरवाळ’चे नाव बदलून अहमदपूर केले होते. आता अनेक शहरांची नावे बदलली जात असताना, आम्हाला निजामाची कसल्याही प्रकारची ओळख गावात ठेवायची नाही, असे मत यावेळी अनेक ज्येष्ठ नागरिकांनी व्यक्त केले.
​या निवेदनांसोबत परिसरातील १६ ग्रामपंचायतींचे बिनविरोध ठरावपत्रे, व्यापारी, मित्र मंडळे, संघटना, पक्ष, प्रतिष्ठित नागरिक, संस्था आणि मठांचे लेखी पाठिंबेचे अर्जही जोडण्यात आले आहेत.
​निवेदन सादर करताना उपस्थितांची मांदियाळी
​हे निवेदन सादर करताना शहरातील ज्येष्ठ नागरिक पांडूरंगतात्या पाटील, विश्व हिंदू परिषदे बजरंग दलाचे श्री मधुकर धडे, संघाचे स्वयंसेवक ॲड. स्वप्निल व्हत्ते, त्रिपुंडाचार्य महाराज, विश्वरूप धाराशिवे, खंडेराव टिकोरे, रवि कच्छवे, गजानन चंदेवाड, अमित बिल्लापट्टे, नरेश यादव, संपन्न कुलकर्णी, अंगद सांगोळे, संतोष जाधव, ॲड. धनंजय चाटे, बाळासाहेब शेळके, राम रत्नपारखे, शरद बोजेवाड, किरण पळसकर, राहुल सोमवंशी, बालाजी बोरेवार, रोहित बोराळकर, पांडू मोरे, नारायण फुलारी, अभिषेक जोशी यांच्या प्रमुख उपस्थितीत अनेक कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
​श्री. मधुकर धडे यांनी यावेळी माहिती दिली की, गावागावातून अजूनही निवेदने जमा होत असून, ती लवकरच मा. उपजिल्हाधिकारी यांच्याकडे सादर केली जातील.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!