‘मुलींचे सक्षमीकरण ही काळाची गरज’ – सुनंदा कुलकर्णी

0
'मुलींचे सक्षमीकरण ही काळाची गरज' - सुनंदा कुलकर्णी

​अहमदपूर: (गोविंद काळे)
​येथील किलबिल नॅशनल स्कूलमध्ये किशोरवयीन मुलींचे सक्षमीकरण या महत्त्वाच्या विषयावर एक दिवसीय चर्चासत्र व मार्गदर्शन शिबिर नुकतेच आयोजित करण्यात आले होते. महिला सक्षमीकरणाची सुरुवात शालेय स्तरापासून झाल्यास स्त्रिया भविष्यात निश्चितच सक्षम होतील, असे प्रतिपादन यावेळी प्रमुख मार्गदर्शिका म्हणून उपस्थित असलेल्या विमलाबाई देशमुख कन्या शाळेच्या सेवानिवृत्त मुख्याध्यापिका आदरणीय सुनंदाताई कुलकर्णी यांनी केले.
​सध्या शासन स्तरावर सार्वजनिक जीवनात महिला सक्षमीकरणाचे प्रयत्न सुरू आहेत. प्रत्येक स्त्री सर्व बाजूंनी सक्षम झाली पाहिजे, या उद्देशाने किलबिल नॅशनल स्कूलने शाळेतील किशोरवयीन मुलींसाठी या शिबिराचे आयोजन केले होते.
​याप्रसंगी मार्गदर्शन करताना सुनंदा कुलकर्णी मॅडम यांनी मुलींना त्यांच्या आरोग्याची योग्य काळजी कशी घ्यावी, तसेच समाजात आपल्या आई-वडिलांचा सन्मान कसा वाढवावा यावर सखोल माहिती दिली. सहशिक्षिका अंतवाल मॅडम यांचीही यावेळी विशेष उपस्थिती होती.
​या कार्यक्रमात शाळेतील सांस्कृतिक विभाग विद्यार्थी प्रतिनिधी पलक जाजू हिने अतिशय समर्पक कविता सादर करून उपस्थितांची वाहवा मिळवली.
​या शिबिरास संस्थेचे सचिव ज्ञानोबा भोसले, प्राचार्य संतोष पाटील, उपप्राचार्य धरमसिंग शिराळे, शाळेतील सर्व किशोरवयीन मुली व महिला शिक्षक स्टाफ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!