किलबिल नॅशनल स्कूलचा नेटबॉलमध्ये डंका! तीन वयोगटात अजिंक्यपद, विभागीय स्पर्धेसाठी निवड

0
किलबिल नॅशनल स्कूलचा नेटबॉलमध्ये डंका! तीन वयोगटात अजिंक्यपद, विभागीय स्पर्धेसाठी निवड

​अहमदपूर: ( गोविंद काळे)
​जिल्हा क्रीडा कार्यालय, लातूर आणि किलबिल नॅशनल स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक ११ ऑक्टोबर रोजी किलबिल नॅशनल स्कूलच्या क्रीडांगणावर जिल्हास्तरीय शालेय नेटबॉल स्पर्धांचे यशस्वी आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत किलबिलच्या संघाने १४ वर्षांखालील मुले, १७ वर्षांखालील मुले आणि १७ वर्षांखालील मुली अशा तीनही वयोगटांमध्ये नेत्रदीपक कामगिरी करत अजिंक्यपद पटकावले आणि नांदेड येथे होणाऱ्या विभागीय स्पर्धेसाठी आपली जागा निश्चित केली.
​या स्पर्धेचे उद्घाटन भाजपचे प्रवक्ते मा. गणेशदादा हाके पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बोलताना हाके पाटील यांनी, “शालेय शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी किमान एका खेळाच्या प्रकाराची निवड करावी. बौद्धिक विकासासोबत शारीरिक विकासही तितकाच महत्त्वाचा आहे,” असे प्रतिपादन केले.
​याप्रसंगी व्यासपीठावर पंचायत समितीचे माजी उपसभापती बाळासाहेब गुट्टे, ए.पी.जी. अब्दुल कलाम विश्वविद्यालयाचे संचालक शंकरराव गुट्टे, शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार प्राप्त प्रा. दत्ताभाऊ गलाले, प्रशांत माने (मुख्याध्यापक, अहिल्यादेवी होळकर माध्यमिक विद्यालय), हणमंत देवकत्ते, अर्जुन गंगथडे, पांडुरंग चाटे, संस्थेचे सचिव ज्ञानोबा भोसले, प्राचार्य संतोष पाटील आणि उपप्राचार्य धरमसिंग शिराळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
​या जिल्हास्तरीय स्पर्धेत संपूर्ण जिल्ह्यातून १४, १७ आणि १९ वर्ष वयोगटातील मुले व मुलींचे मिळून एकूण २० संघ सहभागी झाले होते.
​किलबिलच्या विजयी संघाचे यश:
​१४ वर्षे मुले (कर्णधार: राजवीर जाधव): राजवीर जाधव, मधुर गादेवार, कुलदीप खडके, व्यंकटेश कोटलवार, रोहन शिंदे, श्रेयस शिंदे, विशाल चाळक, सूक्ष्म चाळक, समर्थ वाडकर, आदित्य मरलापल्ले, मंथन बरगे आणि हर्ष गडीलोहार.
​१७ वर्षे मुले (कर्णधार: श्रीयोग फड): श्रीयोग फड, आदित्य हलगरे, रुद्र मोरे, राधेश्याम मुळगीर, पृथ्वीराज सोमवंशी, राज भोसले, दिनेश देशमुख, सुमित शिंदे, रोहन गुट्टे, तुषार सुरवसे, दत्तात्रय शेळके आणि दुर्गेश पवार.
​१७ वर्षे मुली (कर्णधार: श्रावणी कदम): श्रावणी कदम, सना बागवान, वैष्णवी सूर्यवंशी, स्वराली कुदळे, क्षितिजा पाटील, श्रेया लुंगारे, अंतरा सूर्यवंशी, प्राप्ती पाटील, दिव्या श्रीरामे, श्रुती केंद्रे, आदिती भोसले आणि विधी कचवे.
​या सर्व खेळाडूंना शाळेचे क्रीडा शिक्षक विशाल सर्वदे, मोसिन शेख, कासिम शेख, दत्तात्रेय गिरी आणि निलेश बन यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
​कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे सचिव ज्ञानबा भोसले यांनी केले, तर प्राचार्य संतोष पाटील यांनी उपस्थितांचे आभार मानले. सूत्रसंचालन श्रीकांत वलांडे यांनी केले. स्पर्धेला जिल्हाभरातून चांगला प्रतिसाद मिळाला.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!