लालबहादुर शास्त्री प्राथमिक विद्यालयात वाचन प्रेरणा दिन साजरा.

0
लालबहादुर शास्त्री प्राथमिक विद्यालयात वाचन प्रेरणा दिन साजरा.

उदगीर(प्रतिनिधी): भारतीय शिक्षण प्रसारक संस्था,अंबाजोगाई द्वारा संचलित लालबहादुर शास्त्री प्राथमिक विद्यालयात माजी राष्ट्रपती डॉ ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त इयत्ता तिसरी, चौथी विभागात वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून मुख्याध्यापक अंकुश मिरगुडे तर, प्रमुख मार्गदर्शक म्हणून सचिन आगलावे व प्रमुख पाहुणे म्हणून सुधाकर पोलावार व उपस्थित होते.
प्रमुख मार्गदर्शक सचिन आगलावे यांनी डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या कार्याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.वाचाल तर वाचाल या उक्तीप्रमाणे वाचनाचे फायदे समजावून सांगितले. अध्यक्षीय समारोपपर भाषणात मुख्याध्यापक अंकुश मिरगुडे यांनी वाचनाने आपली प्रगती होते,माणुस शहाणा होतो. सर्व विद्यार्थ्यांनी दररोज किमान अर्धा तास तरी मन लावून वाचन्याचे आवाहन केले. यानंतर सर्व विद्यार्थ्यांचे वाचन घेण्यात आले.सुत्रसंचलन तुकाराम पेद्दावाड यांनी केले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!