छत्रपती शिवाजीराजे महाविद्यालयात डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम यांची जयंती साजरी
उदगीर (प्रतिनिधी)
छत्रपती शिवाजीराजे महाविद्यालयात डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांची जयंती साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.ह.वा.कुलकर्णी होते. त्यांनी डॉ.कलाम यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. आपल्या मनोगतातून त्यांनी डॉ. कलाम यांच्या विचार आणि कार्यावर प्रकाश टाकताना म्हटले की, एपीजे अब्दुल कलाम यांनी भारताचे ११ वे राष्ट्रपती म्हणून सर्वोच्च पदावर कार्य केले. त्यांनी अत्यंत खडतर परिस्थितीत शिक्षण घेऊन बी.एस्सी.,एम.एस्सी करुन अरोनॉटिक्स विभागात कार्य करून संशोधनाला सुरुवात केली. त्यानंतर पृथ्वी, अग्नी,त्रिशूळ अशी क्षेपणास्त्र तयार करून आपला जगामध्ये दबदबा निर्माण केला.म्हणून त्यांना मिसाईल मॅन म्हणून ओळखले जाते. एक शास्त्रज्ञ ते लोकप्रिय राष्ट्रपती हा त्यांचा प्रवास मोलाचा ठरला.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक संयोजक तथा मराठी विभागप्रमुख डॉ. सुरेश शिंदे यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ.डी.बी. मुळे यांनी केले. या कार्यक्रमात प्रबंधक बी. के. पाटील, अधिक्षक व्ही. डी. गुरनाळे, प्राध्यापक वृंद कार्यालयीन कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
