राष्ट्रीय महामार्गावरील पडलेल्या खड्यामध्ये रिपाइं बेशरमाची झाडे लावून निषेध करणार

0
राष्ट्रीय महामार्गावरील पडलेल्या खड्यामध्ये रिपाइं बेशरमाची झाडे लावून निषेध करणार

उदगीर (एल पी उगिले)राष्ट्रीय महामार्गावरील छत्रपती शिवाजी महाराज चौक उदगीर येथे पडलेल्या खड्ड्यामध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) युवक आघाडी उदगीर च्या वतीने दिनांक 17 ऑक्टोबर 2025 रोजी बेशरमाची झाडे लावून निषेध करणार असल्याची माहिती रिपाई युवक आघडीचे जिल्हाध्यक्ष सुशील कुमार शिंदे यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना दिली.
उदगीर हे शहर राष्ट्रीय महामार्गावरील वसलेलं व्यापारासाठी व शिक्षणासाठी प्रसिद्ध असलेले हे शहर आहे. राष्ट्रीय महामार्गावर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक, छत्रपती राजर्षी शाहू महाराज चौक येथे तसेच वळण रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडलेले आहेत. वेळोवेळी या संदर्भात प्रसिद्धी माध्यमांनी आणि कार्यकर्त्यांनी निवेदन देऊन रस्ता दुरुस्त करण्याची मागणी केली. मात्र थातूरमातूर खड्डे बुजवण्याचे काम करून त्यात केवळ माती किंवा सिलकोट टाकण्यात आले. परिणामतः पाऊस आला की ते खड्डे पुन्हा पूर्वीपेक्षा मोठे होऊन वाहतुकीला अडथळा निर्माण करत आहेत. या खड्ड्यामुळे अपघात होत असून सामान्य जनतेचे सणासुदीच्या काळामध्ये हाल होत असून, येत्या दोन दिवसांमध्ये उदगीर येथील राष्ट्रीय महामार्गावरील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील, वळण रस्त्यावरील, छत्रपती राजर्षी शाहू महाराज चौकातील रस्त्यावर पडलेले खड्डे येत्या दोन दिवसात न बुजवल्यास रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) युवक आघाडी उदगीर च्या वतीने दिनांक 17 ऑक्टोबर 2025 रोजी रस्त्यावरील पडलेल्या खड्ड्यामध्ये बेशरमची झाडे लावून प्रशासनाचा निषेध करण्यात येणार आहे. असे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया युवक आघाडी लातूर जिल्हाध्यक्ष सुशीलकुमार शिंदे यांनी सांगितले आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!