महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात ए. पी. जे. अब्दुल कलाम जयंती व वाचन प्रेरणा दिन साजरा

0
महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात ए. पी. जे. अब्दुल कलाम जयंती व वाचन प्रेरणा दिन साजरा

उदगीर (प्रतिनिधी) येथील महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या सुरुवातीस डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. हा उपक्रम दिनविशेष समितीचे प्रमुख प्रा. डॉ. एम. एस. खांडेकर यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून पार पडला. यावेळी उपस्थितांना ग्रंथपाल पेन्सलवार यांनी वाचनाची आवड निर्माण होण्यासाठी लागणारी माहिती विविध समाज माध्यमातून दिली. यावेळी प्राचार्य डॉ. आर. के. मस्के, उपप्राचार्य डॉ. एस. एन. हल्लाळे, ग्रंथपाल डॉ. एल. बी. पेन्सलवार, प्राध्यापक वर्ग तसेच शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!