छत्रपती शिवाजी महाराज गौरव अवॉर्ड २०२१ नी मा.खा. डॉ सुनील बळीराम गायकवाड सन्मानित

छत्रपती शिवाजी महाराज गौरव अवॉर्ड २०२१ नी मा.खा. डॉ सुनील बळीराम गायकवाड सन्मानित

मुंबई ( विशेष प्रतिनिधी ) : आज मुंबई येथील ऑर्किड हॉटेल येथे छत्रपती शिवाजी महाराज गौरव अवॉर्ड २०२१ लातूर चे माजी खासदार प्रोफेसर डॉ सुनील बळीराम गायकवाड यांना कोरोना चे निर्बंध पाळून झालेल्या भव्य कार्यक्रमामध्ये अनेक मान्यवरांच्या उपस्थिती मध्ये बॉलिवूड चे प्रसिद्ध अभिनेते राजपाल यादव यांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.


दादासाहेब फाळके आयकॉन अवॉर्ड फिल्म ऑरगनायझेशन चे कल्याणजी जाना यांनी आयोजित केलेल्या अवॉर्ड फंक्शन मध्ये डॉ सुनील गायकवाड यांना त्यांनी १६ व्या लोकसभे मध्ये केलेल्या उत्कृष्ट कामगिरी बद्दल. त्यांना हा मानाचा पुरस्कार मानपत्र आणि मानचिन्ह देऊन करण्यात आला.

छत्रपती शिवाजी महाराज गौरव अवॉर्ड २०२१ नी मा.खा. डॉ सुनील बळीराम गायकवाड सन्मानित


या अवॉर्ड कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून माजी खासदार डॉ सुनील बळीराम गायकवाड यांच्या आणि “भाभी जी घर पर है” या हिंदी सिरीयल ची लोकप्रिय अभिनेत्री चारू यांच्या हस्ते हिंदी गायक जान कुमार सानु यांना आणि अनेक क्षेत्रातील नामवंत व्यक्ती ना पुरस्कार देण्यात आला.
अभिनेता ऋषभ राणा, अभिनेता राजपाल यादव, अभिनेता तथा हास्य कवी असलम कुरेशी, जान कुमार सानु, अभिनेत्री चारू, प्रसिद्ध निवेदिका सिमरण आहुजा,कार्यक्रम चे संयोजक कल्याणजी जाना. आदी उपस्थित होते.
डॉ सुनील बळीराम गायकवाड यांना मिळालेल्या पुरस्कारा बद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

About The Author

You may have missed

error: Content is protected !!