महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात इंदिरा गांधी आणि सरदार वल्लभाई पटेल यांना अभिवादन

0
महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात इंदिरा गांधी आणि सरदार वल्लभाई पटेल यांना अभिवादन

उदगीर (प्रतिनिधी) येथील महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात स्वतंत्र भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त व पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश तोंडारे आणि कोषाध्यक्ष महादेव नौबदे यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी अ‍ॅड. प्रकाश तोंडारे यांनी उपस्थित प्राध्यापक व कर्मचाऱ्यांना ‘राष्ट्रीय एकतेची शपथ’ दिली. कार्यक्रमास महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे सदस्य भीमाशंकर मुद्दा, बसवराज पाटील मलकापूरकर, प्रा. आडेप्पा अंजुरे, शिवराज वल्लापुरे, डॉ. श्रीकांत मध्वरे, प्रशांत पेन्सलवार, प्राचार्य डॉ. आर. के. मस्के, ग्रंथपाल डॉ. एल. बी. पेन्सलवार, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी प्रा. डॉ. बी. एस. होकरणे, प्रा. डॉ. जी. जी. जेवळीकर, कार्यालय प्रमुख दयानंद स्वामी तसेच प्राध्यापक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!