भारतरत्न प.पु. डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे ना. पाटील व ना. नाईक यांच्या हस्ते अनावरण

0
भारतरत्न प.पु. डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे ना. पाटील व ना. नाईक यांच्या हस्ते अनावरण

उदगीर (प्रतिनिधी) : विश्वरत्न, भारतरत्न प.पु. डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांचा भव्य पुर्णाकृती पुतळा उदगीर शहरात उभारावा अशी गेल्या अनेक दशकापासुनची समाज बांधवांची मागणी होती. त्यांच्या मागणीचा विचार करुन कोट्यावधी रुपये खर्च करुन माजी मंत्री आ.संजय बनसोडे यांच्या संकल्पनेतुन पुर्णाकृती उभारला असुन शहरातील नांदेड – बीदर रोडवरील मुख्य रस्त्यालगत भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या भव्यदिव्य पूर्णाकृती पुतळयाचे अनावरण महाराष्ट्राचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील व पर्यटन, सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री इंद्रनिल नाईक यांच्या हस्ते मोठ्या थाटात करण्यात आले.या प्रसंगी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी खा.प्रा.जोगेंद्र कवाडे, माजी क्रीडामंत्री तथा आ. संजय बनसोडे, आ. प्रताप पाटील चिखलीकर, आ.अमोल मिटकरी, भदंत उपगुप्त महाथेरो, भंते पय्यानंद, भंते नागसेन बोधी, सौ.शिल्पा बनसोडे, साताऱ्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सोळसकर, उषा कांबळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस व्यंकट बेद्रे, माजी उपाध्यक्ष रामचंद्र तिरुके, उपजिल्हाधिकारी सुशांत शिंदे, तहसीलदार राम बोरगावकर, मुख्याधिकारी सोमानाथ जाधव, भरत चामले, समीर शेख, ब्रह्माजी केंद्रे, रामराव बिरादार, जळकोटच्या नगराध्यक्षा प्रभावती कांबळे, उपनगराध्यक्ष मन्मथ किडे, उदगीर राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बालाजी भोसले, जळकोट राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संग्राम हासुळे पाटील, भाजपाचे जळकोट तालुकाध्यक्ष सत्यवान पांडे, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख चंद्रकांत टेंगटोल कार्याध्यक्ष वसंत पाटील, विठ्ठल चव्हाण, संतोष तिडके, शफी हाशमी, प्रदीप जोंधळे, अभिजीत औटे, तात्या पाटील, श्याम डावळे, बाळासाहेब मरलापल्ले, गोविंद ब्रह्मांना, अमोल अनकल्ले, मनोज पुदाले, रामराव राठोड, बालाजी केंद्रे, अनिल मुदाळे, अनिरुध्द गुरुडे, आदी उपस्थित होते.

यावेळी महागायक आदर्श शिंदे यांच्या भिमगितांचा कार्यक्रम संपन्न झाला.
भारतरत्न डॉ. आंबेडकर चौकात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते फटाक्यांच्या भव्य आतिषबाजीत महामानव, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळ्याचे अनावरण संपन्न झाले. यावेळी पुजनीय भिक्खु संघ उपस्थित होते.
भारतरत्न प.पु. डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांचा भव्य पुर्णाकृती पुतळा उभारल्याबद्दल माजी मंत्री आमदार संजय बनसोडे यांचे समाजबांधवांच्या वतीने आभार व्यक्त केले जात आहेत.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!