औराद कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये तीन कर्मचारी सेवा निवृत्त व त्यांचा सत्कार

औराद कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये तीन कर्मचारी सेवा निवृत्त व त्यांचा सत्कार

औराद (भगवान जाधव) : कृषी उत्पन्न बाजार समिती येथे कार्यरत असलेले माजी सचिव पांडुरंग नाईकवाडे, लिपिक रायभान नरवडे, सेवक व्यंकटराव कांबळे यांनी आजपर्यंत आपल्या कार्यकाळात प्रामाणिक सेवा दिली. त्यांच्या कार्याचा निरोप समारंभ महणून नूतन नियुक्त झालेले अशासकीय संचालक मंडळ यांनी सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात सेवा निवृत्त झालेल्या कर्मचारी व त्यांच्या कुटुंबाचा शाल श्रीफळ व आहेर करून अशासकीय संचालक मंडळ सभापती हाजी सराफ, उपसभापती लक्ष्मण कांबळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या कार्य क्रमासाठी संचालक संजय बडूरे,गंगाधर चव्हाण, उल्हास सूर्यवंशी, सचिव सतीश मरग्णे रमेश तेलंग, चंद्रपाल कांबळे, विलास भंडारे, उमाकांत टेंकाळे, सगरे बदुरे अडत व्यापारी तसेच हमाल बांधव उपस्थित होते.

About The Author

error: Content is protected !!