निलंगा उप सभापती अंजलीताई बोंडगे यांची जि.प.तांबाळा शाळेस भेट

निलंगा उप सभापती अंजलीताई बोंडगे यांची जि.प.तांबाळा शाळेस भेट

निलंगा (भगवान जाधव) : पंचायत समितीच्या उप सभापती अंजलीताई बोंडगे (पाटील) व त्यांचे पती राजा पाटील जि.प.तांबाळा शाळेस भेट दिली. लातूर जि.प.चे मुख्य कार्यकारी अभिनव गोयल यांच्या संकल्पनेतून ‘लातूर जिल्ह्यात’ ५०० शाळांत ‘बाला उपक्रम’ राबविला जात आहे. निलंगा तालुक्याचे गट विकास अधिकारी अमोल ताकभाते व गट शिक्षणाधिकारी संतोष स्वामी यांच्या अथक परिश्रमातून ‘निलंगा तालुक्यातील’ ६० शाळांत ‘बाला उपक्रम’ राबविण्यात येत आहे. महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर वसलेल्या व निलंगा तालुक्यात अव्वल स्थानी असलेल्या तांबाळा गावातील जिल्हा परिषद शाळेस अंजलीताई बोंडगे यांनी भेट दिली.शाळेचे मुख्याध्यापक दयानंद मठपती यांच्या अथक परिश्रमातून व त्यांच्या सहका-यांच्या सहकार्यातून शाळेत अनेक नाविण्यपूर्ण उपक्रम राबविण्यात आले आहेत.त्या सर्व उपक्रमांची त्यांनी पाहणी केली. गांडूळ खत निर्मीती प्रकल्प, शेततळे, शेडनेट (पाॕली हाऊस), शून्य कचरा, विचार दालन, स्नेह भोजन, माझा वाढदिवस-माझे झाड, माती अडविण्यासाठी व पाणी जिरविण्यासाठी १३७ मीटर्सचे ‘सलग समतल चर’, नाविण्यपूर्ण निसर्ग शाळा, जनावरांना पिण्याचे पाणी, टाकाऊ वस्तूंचा पुनर्वापर, सागवानी लाकडाचे रेलिंग, ठिकठिकाणी दिशादर्शक असे अनेक समाजोपयोगी उपक्रम शाळेने राबविलेले आहेत.बाला उपक्रमातील अठ्ठावीस बाबी पूर्ण करुन अनेक नाविण्यपूर्ण उपक्रम शाळेत राबविण्यात येत आहेत. या उपक्रमांची पाहणी अंजलीताईंनी केली व मुख्याध्यापक दयानंद मठपती यांचे तोंडभरुन कौतुक केले.

निलंगा उप सभापती अंजलीताई बोंडगे यांची जि.प.तांबाळा शाळेस भेट

समग्र शिक्षा अंतर्गत चालू असलेल्या कामाची त्यांनी पाहणी करुन समग्रचे कार्यकारी अभियंता विजयकुमार वलांडे,कनिष्ठ अभियंता सूर्यवंशी व शाळा व्यवस्थापन समितीचे अभिनंदन केले. गावक-यांच्या ‘लोकसहभागाबद्दल त्यांनी तांबाळकरांचे अभिनंदन’ केले. याप्रसंगी शाळेच्यावतीने अंजलीताई व राजा पाटील यांचा सत्कार ‘सभापती पती’ सुरेशराव बिराजदार व शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष अमृत तुमकुटे यांनी सत्कार केला. गावचे पोलीस पाटील ओमकार स्वामी, दाऊदसाब सय्यद व शाळेतील सर्व शिक्षक उपस्थित होते.

About The Author