पशुपालकाची समस्या झाली दुर : जि.प.सदस्या सौ.विजयाताई बिरादार यांचा कार्याला आले यश!
तोंडार (प्रतिनिधी) : उदगीर तालुक्यातील तोंडार गावात आधार भुत ग्राम उपकेंद्र (जनावरांचा दवाखाना) मधे गत तिन वर्ष झाले , डॉक्टर नसल्याने हे केंद्र सेवकावर भरवशावर असल्याने अनेक पशुपालकाना डॉक्टर अभावी अनेक समस्यांना सामोरे जावे लागत असल्याने, त्या संदर्भात वेळोवेळी संबंधित प्रशासनास या तोंडार ग्राम उपकेंद्रात डॉक्टर ची नेमणूक करण्याची विनंती केली असता , त्याची दखल प्रशासनाने घेत तोंडार चा आधारभूत ग्राम उपकेंद्र अंतर्गत चार ते पाच गावे येतात, या सर्व गावात हजारो चा जवळपास जनावरे असल्याने प्रतेक गावात जनावरांवर उपचार करण्यासाठी प्रतेक गावात सेवकास जावे लगत असल्याने सदर चे उपकेंद्र बंद रहात होते, त्यामुळे तोंडारचा पशुपालकाची हेळसांड होत होती, त्यामुळे जि.प.सदस्या सौ.विजयाताईबिरादार यानीसंबंधित प्रशासनास पाठपुरावा केल्याने दि: :05/08/21 रोजी तोंडार चा उपकेंद्रात डॉक्टर लोंढे याची नियुक्ती झाल्याचे पत्र जि. प गटाचा सदस्या सौ.विजयाताई बिरादार यांना मिळाले या मुळे परिसरातील पशुपालकाची होणारी हेळसांड दुर झाल्याने त्यामुळे जि.प.सदस्याचे पशुपालकातुन अभिनंदन होत आहे.