प्रा.प्रदीप वीरकपाळे कोरोना योध्दा पुरस्काराने सन्मानीत 

प्रा.प्रदीप वीरकपाळे कोरोना योध्दा पुरस्काराने सन्मानीत 

उदगीर (प्रतिनिधी) : उदगीर येथील किंग ऑफ केमिस्ट्री “म्हणून सुप्रसिद्ध असलेले तसेच श्री रत्नगंगा केमिस्ट्री क्लासेसचे संचालक तथा खाजगी कोचिंग क्लासेस संघटनेचे सचिव प्रा.प्रदीप वीरकपाळे यांचा साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे सावर्जनिक जयंती समितीच्या वतीने कोरोना योध्दा पुरस्काराने सन्मानीत करणयात आला आहे. प्रा. प्रदीप वीरकपाळे यापुर्वी तब्बल राष्ट्रीय, राज्यस्तरीय, जिल्हास्तरीय तथा विविध क्षेत्रातील बावन पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. याच प्रमाणे कोरोना महामारीच्या काळात मागील जवळपास दिढ वर्षांत केलेल्या सामाजिक (समाज प्रबोधन, अन्नधान्य वाटप, मास्क व सॅनिटायझरचे वाटप इत्यादी) उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन त्यांना लोकशाहीर, साहित्यरत्न आण्णाभाऊ साठे सार्वजनिक जयंती महोत्सव समिती, उदगीरच्या वतीने कोरोना योद्धा म्हणून  सन्मानीत करण्यात आला आहे.  या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सहकार महर्षी चंद्रकांत अण्णा वैजापुरे तर प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस निरीक्षक गोरख दिवे, ग्रामीण पोलीस निरीक्षक दिपक वाघमारे, डाॅ. पवार, डाॅ.पवार मॅडम,डाॅ.विजय वासुदेव, नगरसेवक गणेश गायकवाड, उद्योजक सुनिल काबंळे, राहुल पाटील मलकापुरकर, जयंती महोत्सव चे अध्यक्ष जवाहरलाल काबंळे, कार्याध्यक्ष श्रीकांत पाटील, उपाध्यक्ष राम शिंदे, कर्मचारी, विविध क्षेत्रातील मान्यवर, जयंती महोत्सव समितीचे सर्व पदाधिकारी मान्यवर व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About The Author