लोकनेते निवृत्ती सांगवे यांच्या वतीने धनगर सोसायटी येथील हनुमान मंदिराचे सुशोभीकरण

0
लोकनेते निवृत्ती सांगवे यांच्या वतीने धनगर सोसायटी येथील हनुमान मंदिराचे सुशोभीकरण

उदगीर (एल पी उगिले) येथील सामाजिक कार्यकर्ते तथा दलित मुस्लिम ऐक्य परिषदेचे निमंत्रक, राष्ट्रीय दलित अधिकार मंचचे प्रदेशाध्यक्ष तथा दलित पॅंथरचे प्रदेश उपाध्यक्ष निवृत्तीराव सांगवे यांना फुलेनगर परिसरातील हनुमान भक्तांनी हनुमान मंदिराचे सुशोभीकरण करण्यासंदर्भात विनंती केली होती. लोकांचा आग्रह विचारात घेऊन निवृत्तीराव सांगवे यांनी फुलेनगर येथील हनुमान मंदिराचे सुशोभीकरण करून परिसर स्वच्छ आणि भाविक भक्तांना दर्शनासाठी सोयीचे होईल, अशा पद्धतीचा बनवला आहे. या सुशोभीकरण मोहिमेच्या वेळी नगरसेवक इब्राहिम नाना, अच्युत गोदे, नरसिंग कुपे, लखन महाका, नवनाथ मुंजेवार, नरसिंग मेहत्रे, सोमनाथ हुडे, संदीप चिंतले, संतोष मेहकरे, विजय दाडगे, सोमेश्वर मेहत्रे, बालाजी रावणकोळे, शिवा हुडे, बाळू खेमे, यल्लप्पा कुपे, तुळसाबाई भिंगे, मथुरा शेळके, संभाजीराव तिकटे, प्रकाश मसुरे, इत्यादी मान्यवर उपस्थित होते. भाविक भक्तांची मागणी लगेच मान्य करून प्रत्यक्ष अंमलबजावणी करणारा शब्दाला जागणारा नेता म्हणून निवृत्तीराव सांगवे यांचे नाव लौकिक आहे. त्याप्रमाणे त्यांनी प्रत्यक्ष काम करून दाखवले. याबद्दल फुलेनगर परिसरातील नागरिकांनी निवृत्तीराव सांगवे यांचे आभार व्यक्त केले आहेत.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!