महिलेला लाकडाने मारहाण, चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल
उदगीर (एल पी उगिले) येथील पेटदरवाजा परिसरात झालेल्या मारहाण प्रकरणी उदगीर शहर पोलिसांनी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलिस सूत्राकडून हाती आलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सखुबाई रवी सुर्यवंशी (वय 34, रा. पेटदरवाजा, उदगीर) यांनी दिलेल्या तक्रारीवरून आरोपी सचिन शिवाजी सुर्यवंशी, शिवाजी शंकरराव सुर्यवंशी, शांताबाई शिवाजी सुर्यवंशी आणि शितल सुनील वाघमारे (सर्व रा. पेटदरवाजा, उदगीर) यांच्याविरुद्ध शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
ही घटना २ नोव्हेंबर २०२५ रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास फिर्यादीच्या घरासमोर सामायिक रस्त्यावर घडली. फिर्यादी व तिच्या पतीस आरोपींनी शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली, तसेच आरोपी सचिन सुर्यवंशी यांनी हातातील लाकडाने फिर्यादीच्या डोक्यावर वार करून जखमी केले.
या प्रकरणी पोलीस नाईक सगर यांनी फिर्याद नोंदवली असून पुढील तपास पोलीस हवालदार कांबळे करत आहेत. गु. र. न. 385/25 कलम 118(1), 115(2), 351(2)(3), 352, 3(5) बीएनएस अंतर्गत दाखल करण्यात आला आहे.पुढील तपस शहर पोलीस करत आहेत.
