स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे बिगुल वाजले
उदगीर (प्रतिनिधी)
महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर झाल्या असून, 246 नगरपरिषद आणि 42 नगरपंचायतीच्या निवडणुकांसाठी अर्ज दाखल करण्याची तारीख 10 नोव्हेंबर पासून सुरू असून अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख 17 नोव्हेंबर आहे. अर्जाची छाननी 18 नोव्हेंबर रोजी होईल. अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख 25 नोव्हेंबर असेल, गरज असेल तिथे मतदान प्रक्रिया 2 डिसेंबर रोजी पूर्ण होईल. आणि लगेच 3 डिसेंबर रोजी मतमोजणी केली जाणार असल्याचे निवडणूक आयोगाने जाहीर केले आहे.
