कासार सिरसी जिल्हा परिषदेसाठी अपक्ष उमेदवाराची मोर्चे बांधणीला सुरवात

0
कासार सिरसी जिल्हा परिषदेसाठी अपक्ष उमेदवाराची मोर्चे बांधणीला सुरवात

सर्वसामान्य जनतेच्या विकासासाठी मी जिल्हा परिषद लढवणार:– गिरीश चिंचनसुरे

कासार सिरसी : — बालाजी मिलगीरे

औसा मतदारसंघातील कासार सिरसी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती लढण्यासाठी अपक्ष उमेदवाराची मोर्चे बांधणीला सुरू झाल्याचे दिसून येत आहे.
या मध्ये जिल्हा परिषदेसाठी इच्छुक उमेदवार येथील युवा नेते गिरीश प्रकाशअप्पा चिंचनसुरे यांनी लढणार असल्याचे बोलले जात आहे.
सध्या सर्वत्र स्थानिक स्वराज्य संस्थेचे निवडणुकीचे बिगुल वाजल्या असल्याकारणाने सर्वच पक्षाच्या नेते मंडळींची आणि कार्यकर्त्यांची गोडधोड सुरू असून बैठक वर बैठका आयोजित केले जात असल्याचे दिसून येत आहे.
निलंगा तालुक्यातील औसा मतदारसंघातील 68 गावाचा मतदान लोकसभा असो, विधानसभा असो, या स्थानिक स्वराज्य संस्थेचा निवडणूक असो, प्रत्येक वेळी निवडणुकीसाठी गेम चेंजर साबित झालेले दिसून आले आहे.
म्हणून या 68 गावाच्या मतदारांकडे लातूर जिल्ह्याचे विशेष लक्ष लागून राहिले आहे
यामध्ये कासार सिससी केंद्र स्थानी असून येथील स्थानिक स्वराज्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे यामध्ये महाविकास आघाडी आणि महायुतीच्या उमेदवारांची जुळवा जुवळ सुरू असतानाच अपक्ष उमेदवाराची एंट्री होत असल्याचे दिसून येत आहे.
कासार सिरसी माजी सरपंच कै, प्रकाशअप्पा चिंचनसूरे यांचा मुलगा गिरीश प्रकाशअप्पा चिंचनसुरे यांनी अपक्ष लढणार असल्याचे स्वतः आमच्याशी संवाद साधताना स्पष्ट केले.
कासार सिरसी व परिसरातील सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी मी आणि माझ्या टिम मिळून जिल्हा परिषद गणासाठी मी आणि पंचायत समिती गटासाठी माझ्या टीमने जे ठरवेल त्या व्यक्तीस सोबत घेऊन आम्ही लढणारा असल्याचे चिंचनसूरे यांनी यावेळी म्हणाले.
या परिसरात वडीला पासून सामाजिक बांधिलकी जपत जनतेच्या मनात आपले वेगळे स्थान निर्माण केलेले युवा नेते गिरीश चिंचनसुरे यांनी रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला आहे.
चिंचनसुरे यांच्या उमेदवारीला स्थानिक तरुणाईचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, त्यांच्या प्रवेशामुळे येथील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक चुरशीची होण्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत.
या निवडणुकीत कासार सिरसी जिल्हा परिषद गण सर्वसाधारण पुरुषासाठी, तर पंचायत समिती गट ओबीसी पुरुषासाठी आरक्षित असल्याने, या दोन्ही प्रवर्गांतील कार्यकर्त्यांमध्ये चुरस निर्माण होताना दिसत आहे.
चिंचूनसुरे यांचा या गणा मध्ये चांगली पक्कड आहे असे म्हणले जाते युवकांना संघटित करून, सामाजिक कार्याद्वारे विकासाच्या दिशेने वाटचाल सुरू केली आहे.
मागील दहा वर्षांपासून सामाजिक वाटचाल सुरु आहे.
त्यांच्या या निस्वार्थ कामगिरीमुळे कासार सिरसी परिसरात त्यांचा जनसंपर्क, लोकाधार आणि विश्वासार्हता वाढली आहे. आज त्या भागातील प्रत्येक गावात त्यांचे नाव प्रामाणिक पणे घेतले जाते.
युवकांमध्ये लोकप्रिय चेहरा म्हणून त्याची ओळख आहे.
कासार सिरसी परिसरातील युवक वर्गात गिरीश चिंचनसुरे हे लोकप्रिय चेहरा बनले आहेत. त्यांनी बेरोजगार युवकांना स्वावलंबनाच्या दिशेने प्रेरित साधा करीत असतात.
सामाजिक सलोखा आणि एकात्मतेचा संदेश सामाजिक एकात्मतेचा धागा मजबूत केला आहे.
ग्रामपातळीवर झालेल्या अनेक वादांमध्ये मध्यस्थी करून त्यांनी शांतता, सलोखा आणि विकासाचा मार्ग दाखवला आहे.
त्यामुळे त्यांना “जनतेचा नेता” म्हणून ओळख मिळाली आहे.
चिंचनसुरे यांचा प्रामाणिकपणा, कार्यकुशलता आणि जनतेशी थेट संवाद कोणीही असो जे पोटात तेच ओठात अशी ठाम भूमिका घेऊन अनेक प्रश्न जागेवरच मिठवीत असतं यामुळे त्यांचा विजय निश्चित मानला जात आहे,
अशी चर्चा स्थानिक स्तरावर होत आहे त्यांचा उत्साही, प्रामाणिक आणि लोकाभिमुख दृष्टिकोन लक्षात घेता, कासार सिरसी मतदारसंघातील ही निवडणूक राजकीय शिस्त, तरुण नेतृत्व आणि विकासाच्या आदर्श ठरेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!