मी भाजप सोबतच, पक्षाच्या विजयासाठी प्रयत्न करणार – माजी नगराध्यक्ष निटुरे

0
मी भाजप सोबतच, पक्षाच्या विजयासाठी प्रयत्न करणार - माजी नगराध्यक्ष निटुरे

उदगीर (एल पी उगिले) भारतीय जनता पक्षाकडे आपण उदगीर नगर परिषदेच्या अध्यक्षपदासाठी उमेदवारी मागितली होती. मात्र ती उमेदवारी आपल्याला मिळाली नाही. दरम्यान पक्ष पुन्हा विचार करू शकेल, या धोरणाने आपण भारतीय जनता पक्षाच्या नावाने एक आणि अपक्ष एक, अशा पद्धतीने उमेदवारी अर्ज दाखल केला होता. महायुतीच्या वतीने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री बावनकुळे आणि लातूर जिल्हा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे प्रमुख आ. अभिमन्यू पवार, आ. रमेश आप्पा कराड, आ. संभाजी भैय्या निलंगेकर, माजी मंत्री तथा उदगीर विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय बनसोडे, भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष बसवराज पाटील मुरूमकर या सर्वांनी विनंती केल्यावर आपण अपक्ष म्हणून भरलेला उमेदवारी अर्ज परत घेत असल्याची घोषणा माजी नगराध्यक्ष तथा भाजपचे नेते राजेश्वर नीटुरे यांनी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना केली आहे.
आपण भारतीय जनता पक्षाचाच घटक असल्याने महायुतीच्या उमेदवारांच्या विजयासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू, उदगीर नगर परिषदेवर भारतीय जनता पक्षाचा झेंडा फडकला पाहिजे. या विचाराने पक्ष संघटन बांधणीसाठी सर्वतोपरी प्रयत्न करू. असे आश्वासनही त्यांनी याप्रसंगी दिले.
राजेश्वर निटूरे हे उदगीरच्या राजकारणातील एक मोठे प्रस्थ असल्याने आणि उदगीर नगर परिषदेवर तब्बल सात वेळा नगराध्यक्ष म्हणून त्यांनी आपला कारभार उदगीरकरांना दाखवून दिलेला असल्याने, जर ते अपक्ष उमेदवार राहिले असते तर राजकीय गणिते बिघडू शकले असती, या विचाराने महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांनी त्यांना उमेदवारी अर्ज परत घेण्याची विनंती केली, आणि ती विनंती त्यांनी मान्य करून उमेदवारी अर्ज परत घेतला आहे.
त्याबद्दल महायुतीचे नेते आ. संजय बनसोडे यांनी राजेश्वर निटूरे यांचे ऋण व्यक्त केले असून, नगर परिषदेच्या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पक्षाचे सर्वच्या सर्व उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी करावे, असे आवाहन उदगीरकरांना केले आहे. उदगीर शहरांमध्ये विधानसभा निवडणुकीच्या वेळी आपल्याला प्रचंड बहुमत मिळाले होते. त्यापेक्षा जास्त बहुमत नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ. स्वाती सचिन हुडे यांना मिळावे. अशी अपेक्षाही व्यक्त केली आहे.
महाविकास आघाडीचे जास्तीत जास्त उमेदवार मोठ्या फरकाच्या मताधिक्याने विजयी व्हावेत. यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. याप्रसंगी माजी नगरसेवक सचिन हुडे यांनी देखील भाजपचे नेते राजेश्वर निटूरे यांचे ऋण व्यक्त करून सर्व उमेदवाराना विजयी करण्यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न करू, असे आश्वासन दिले. याप्रसंगी भाजपचे माजी नगराध्यक्ष बसवराज बागबंदे तसेच भारतीय जनता पक्षाचे अनेक नेते उपस्थित होते. राजेश्वर निटुरे यांच्या उमेदवारी परत घेण्याने, तसेच आपण भारतीय जनता पक्षासोबतच आहोत, असे स्पष्टीकरण त्यांनी दिलेले असल्याने महायुतीच्या सर्व उमेदवारांमध्ये आत्मविश्वास निर्माण झाला आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

बसस्थानकातील गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील दागिने चोरणाऱ्या महिलेकडून आणखी तीन तोळे सोने जप्त, पाच गुन्हे उघड.‎‎ लातूर (एल पी उगिले) जिल्ह्यातील विविध बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या टोळीवर स्थानिक गुन्हे शाखा, लातूर यांनी प्रभावी कारवाई करत एका महिला आरोपीस अटक करून तिच्याकडून चोरीस गेलेले सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. या कारवाईमुळे औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर येथील बसस्थानक परिसरात घडलेल्या चोरीच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत.‎लातूर जिल्ह्यातील मालमत्तेविषयक गुन्ह्यांवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे यांनी कडक निर्देश दिले आहेत. त्या अनुषंगाने अपर पोलीस अधीक्षक श्री. मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पथक सातत्याने गस्त व माहिती संकलन करून गुन्हे उघडकीस आणण्याचे काम करत आहे.‎ सदर पथकाने दिनांक 5 मार्च रोजी पुनम जितू कांबळे (वय ३४ वर्षे, रा. गांधीनगर, उदगीर, जि. लातूर) हिला ताब्यात घेऊन तिच्याकडून एक सोन्याचे मणी मंगळसूत्र व एक सोन्याची साखळी असा अंदाजे १३ ग्रॅम ३९० मिली वजनाचा सोन्याचा मुद्देमाल हस्तगत केला होता. पुढील तपासासाठी तिला पोलीस ठाणे औसा यांच्या ताब्यात देण्यात आले होते.‎ तपासादरम्यान आरोपी पुनम कांबळे हिने तिची साथीदार अनिता विशाल कांबळे (रा. गांधीनगर, उदगीर) हिच्यासह मागील चार ते पाच महिन्यांपासून औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर बसस्थानक परिसरात बसमध्ये चढणाऱ्या प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेत महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी केल्याची कबुली दिली. ‎त्यावरून नमूद महिला आरोपी पुनम जितू कांबळे यास पुढील तपास कामी पोलीस ठाणे अहमदपूर यांचे ताब्यात देण्यात आले. दरम्यान पोलीस ठाणे अहमदपूर व स्थानिक गुन्हे शाखा यांच्या संयुक्त पथकाने तपास करून पोलीस ठाणे अहमदपूर येथे दाखल असलेल्या सोनसाखळी चोरीच्या आणखी तीन गुन्ह्यांतील जवळपास तीन तोळे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहे.‎याप्रमाणे सदर कारवाईत आरोपी कडून एकूण जवळपास 4.3 तोळे सोन्याचे दागिने, सध्याच्या बाजारभावा नुसार अंदाजे 6 लाख 50 हजार रुपये किमतीचा सोन्याच्या दागिन्याचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एकूण पाच गुन्हे उघडकीस आणण्यात लातूर पोलिसांना यश आले आहे.ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस ठाणे अहमदपूर यांच्या संयुक्त पथकाने पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर व पोलीस निरीक्षक विनोद मेत्रेवार यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रमोद देशमुख, पोलीस अंमलदार संजय कांबळे, सूर्यकांत कलमे, राजेश कंचे, मोहन सुरवसे, विजय पाटील, तुळशीराम बरुरे, पाराजी पुटेवाड, हरी पतंगे, चंद्रकांत केंद्रे, महिला पोलीस अंमलदार सुरेखा मदने, अंजली गायकवाड तसेच पोलीस ठाणे अहमदपूर येथील पोलीस अंमलदार बी. पी. साळवे व जायभाये यांनी केली आहे.‎बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन होणाऱ्या चोरीच्या घटनांवर आळा घालण्या साठी लातूर पोलीस दल सातत्याने दक्ष आहे. नागरिकांनी प्रवास करताना आपल्या मौल्यवान वस्तूंबाबत विशेष काळजी घ्यावी तसेच संशयास्पद व्यक्ती आढळल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यास माहिती द्यावी, असे आवाहन लातूर पोलिसांकडून करण्यात आले आहे.

error: Content is protected !!