२१ वर्षांपासून सतत पत्ता बदलत पोलीस गुंगारा देणारा प्रमुख आरोपी अटकेत.

0
२१ वर्षांपासून सतत पत्ता बदलत पोलीस गुंगारा देणारा प्रमुख आरोपी अटकेत.

लातूर (एल पी उगिले) पोलीसांच्या विशेष पथकाने २००४ सालापासून विविध ठिकाणी वास्तव्य बदलत पोलीस आणि न्यायालयास चकवा देणाऱ्या गंभीर गुन्ह्यातील मुख्य आरोपीस अटक केली असून, दीर्घ काळ प्रलंबित असलेली डारमंड फाईल पुन्हा सक्रिय करण्यात महत्त्वपूर्ण यश मिळाले आहे. सदर आरोपीवर सशस्त्र स्वरूपात फिर्यादीला मारहाण करून दरोडा घालणे, जखमी करणे व रोकड-घड्याळाची जबरी लूट केल्याचा गंभीर गुन्हा दाखल होता.
याबाबत अधिक माहिती अशी की, दि. १७ सप्टेंबर २००४, रात्री २०.१० वा. फिर्यादी भास्कर हरिश्चंद्र शिंदे, हे त्यांच्या लेबर कॉलनी येथील मित्राकडून परत मजगे नगरकडे येत होते. रस्ता निर्मनुष्य व अरुंद असल्याने २५ ते ३० वयोगटातील चार तरुणांनी तलवार, चाकू चा धाक दाखवत फिर्यादीला जीव मारण्याच्या धमक्या देत शर्टच्या वरच्या खिशातील रोख रक्कम,मनगटी घड्याळ जबरदस्तीने काढून घेतले. दरम्यान झटापटीत फिर्यादीच्या डोक्यात वार करून जखमी केल्याची घटना घडली होती. फिर्यादीच्या तक्रारीवरून गांधी चौक पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. १९६/२००४ कलम ३९४, ३४ भारतीय दंड संहिता अन्वये तात्काळ गुन्हा नोंदविण्यात आला.
गुन्हा दाखल होताच आरोपी बालाजी उर्फ बंटी सुधाकर पकाले हा
सतत वास्तव्य व ओळख लपविण्या साठी वेगवेगळी नावे वापरून पोलीस समन्स, वॉरंट टाळण्यासाठी गायब राहुन न्यायालयीन कारवाईत गैरहजर राहुल यंत्रणेला दीर्घकाळ चकवा देत होता.त्यामुळे हा गुन्हा अनेक वर्षे “डारमंड फाईल” म्हणून वर्गीकृत ठेवण्यात आला होता.
अलीकडे लातूर पोलिसांच्या विशेष पथकास विश्वसनीय माहिती मिळाली की, सदरचा आरोपी गरुड चौक रिंग रोड परिसरातील महादेव नगर भागात नाव बदलून राहत आहे. त्यावरून विशेष पथकाने तात्काळ गुप्त चौकशी करत माहिती गोळा करून वेगवेगळ्या पत्त्यावरून मिळणाऱ्या हालचालींची पडताळणी करून पथकास आरोपी तेथेच वास्तव्यास असल्याचे स्पष्ट झाल्यावर, विशेष पथकाने दि. २८/११/२०२५ रोजी आरोपीस ताब्यात घेऊन पोलीस स्टेशन गांधी चौक यांच्याकडे पुढील कार्यवाहीस्तव देण्यात आले.
आरोपीस मुख्य न्यायदंडाधिकारी एस. एन. पाटील यांच्या न्यायालयात सादर करण्यात आले. दोन्ही बाजूंची सुनावणी करून न्यायालयाने आरोपीस दि. १२ डिसेंबर २०२५ पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक अमोल तांबे, अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण,उपविभागीय पोलीस अधिकारी लातूर शहर समीरसिंह साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकातील पोलीस उपनिरीक्षक संजय भोसले, पोलीस अंमलदार दत्तात्रय शिंदे,योगेश गायकवाड,श्रीकांत कुंभार यांनी केली आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

बसस्थानकातील गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील दागिने चोरणाऱ्या महिलेकडून आणखी तीन तोळे सोने जप्त, पाच गुन्हे उघड.‎‎ लातूर (एल पी उगिले) जिल्ह्यातील विविध बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या टोळीवर स्थानिक गुन्हे शाखा, लातूर यांनी प्रभावी कारवाई करत एका महिला आरोपीस अटक करून तिच्याकडून चोरीस गेलेले सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. या कारवाईमुळे औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर येथील बसस्थानक परिसरात घडलेल्या चोरीच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत.‎लातूर जिल्ह्यातील मालमत्तेविषयक गुन्ह्यांवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे यांनी कडक निर्देश दिले आहेत. त्या अनुषंगाने अपर पोलीस अधीक्षक श्री. मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पथक सातत्याने गस्त व माहिती संकलन करून गुन्हे उघडकीस आणण्याचे काम करत आहे.‎ सदर पथकाने दिनांक 5 मार्च रोजी पुनम जितू कांबळे (वय ३४ वर्षे, रा. गांधीनगर, उदगीर, जि. लातूर) हिला ताब्यात घेऊन तिच्याकडून एक सोन्याचे मणी मंगळसूत्र व एक सोन्याची साखळी असा अंदाजे १३ ग्रॅम ३९० मिली वजनाचा सोन्याचा मुद्देमाल हस्तगत केला होता. पुढील तपासासाठी तिला पोलीस ठाणे औसा यांच्या ताब्यात देण्यात आले होते.‎ तपासादरम्यान आरोपी पुनम कांबळे हिने तिची साथीदार अनिता विशाल कांबळे (रा. गांधीनगर, उदगीर) हिच्यासह मागील चार ते पाच महिन्यांपासून औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर बसस्थानक परिसरात बसमध्ये चढणाऱ्या प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेत महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी केल्याची कबुली दिली. ‎त्यावरून नमूद महिला आरोपी पुनम जितू कांबळे यास पुढील तपास कामी पोलीस ठाणे अहमदपूर यांचे ताब्यात देण्यात आले. दरम्यान पोलीस ठाणे अहमदपूर व स्थानिक गुन्हे शाखा यांच्या संयुक्त पथकाने तपास करून पोलीस ठाणे अहमदपूर येथे दाखल असलेल्या सोनसाखळी चोरीच्या आणखी तीन गुन्ह्यांतील जवळपास तीन तोळे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहे.‎याप्रमाणे सदर कारवाईत आरोपी कडून एकूण जवळपास 4.3 तोळे सोन्याचे दागिने, सध्याच्या बाजारभावा नुसार अंदाजे 6 लाख 50 हजार रुपये किमतीचा सोन्याच्या दागिन्याचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एकूण पाच गुन्हे उघडकीस आणण्यात लातूर पोलिसांना यश आले आहे.ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस ठाणे अहमदपूर यांच्या संयुक्त पथकाने पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर व पोलीस निरीक्षक विनोद मेत्रेवार यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रमोद देशमुख, पोलीस अंमलदार संजय कांबळे, सूर्यकांत कलमे, राजेश कंचे, मोहन सुरवसे, विजय पाटील, तुळशीराम बरुरे, पाराजी पुटेवाड, हरी पतंगे, चंद्रकांत केंद्रे, महिला पोलीस अंमलदार सुरेखा मदने, अंजली गायकवाड तसेच पोलीस ठाणे अहमदपूर येथील पोलीस अंमलदार बी. पी. साळवे व जायभाये यांनी केली आहे.‎बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन होणाऱ्या चोरीच्या घटनांवर आळा घालण्या साठी लातूर पोलीस दल सातत्याने दक्ष आहे. नागरिकांनी प्रवास करताना आपल्या मौल्यवान वस्तूंबाबत विशेष काळजी घ्यावी तसेच संशयास्पद व्यक्ती आढळल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यास माहिती द्यावी, असे आवाहन लातूर पोलिसांकडून करण्यात आले आहे.

error: Content is protected !!