एम.एससी. डेअरी सायन्स विभागातील यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार

0
एम.एससी. डेअरी सायन्स विभागातील यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार

उदगीर (प्रतिनिधी): महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयातील एम.एससी. डेअरी सायन्सच्या चार विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट यश संपादन करून विविध नामांकित संस्थांमध्ये उच्च पदांवर स्थान प्राप्त केले आहे. गणेश मिलिंदकुमार पाटील यांची ‘दोडला डेअरी, मिरज येथे एक्झिक्युटिव्ह ऑफिसर’ म्हणून तर ‘सुरज विठ्ठलराव बिरादार यांची उदगीर पंचायत समितीमध्ये ब्लॉक ऑफिसर ‘म्हणून निवड झाली, ‘गणेश हरिदास मोरतळे यांची दोडला डेअरीतर्फे सांगली जिल्ह्यातील जत येथे क्वॉलिटी अ‍ॅश्युरन्स एक्झिक्युटिव्ह’ म्हणून तर ‘कु. वैष्णवी लाळे हिची हैदराबाद जवळील कुरनूर येथे क्वॉलिटी अ‍ॅश्युरन्स एक्झिक्युटिव्ह’ म्हणून निवड झाली आहे. या उल्लेखनीय यशाबद्दल महाविद्यालयात आयोजित कार्यक्रमात म.ए. सोसायटीचे महादेव नौबदे, प्राचार्य डॉ. आर. के. मस्के आणि उपप्राचार्य डॉ. एस. एन. हल्लाळे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी विभाग प्रमुख प्रा. डॉ. सुरेश लांडगे तसेच डेअरी सायन्स विभागातील प्रा. डॉ. ए. एस. होनकर आणि प्रा. डॉ. जे. सी. तोंडारे उपस्थित होते. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष बस्वराज पाटील नागराळकर, उपाध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश तोंडारे, उपाध्यक्ष बसवराज पाटील मलकापूरकर, सचिव डॉ. रामप्रसाद लखोटिया, सहसचिव मल्लिकार्जुन चिल्लरगे, प्रशांत पेन्सलवार तसेच सर्व संस्था सदस्य, प्राचार्य डॉ. आर. के. मस्के, उपप्राचार्य डॉ. एस. एन. हल्लाळे तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!