शिवसैनिकावरील हल्ले खपून घेणार नाही – बालाजी रेड्डी

शिवसैनिकावरील हल्ले खपून घेणार नाही - बालाजी रेड्डी

उदगीर (प्रतिनिधी) : शिवसेनेचे उदगीर तालुका प्रमुख चंद्रकांत टेंगेटोल यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा जाहीर निषेध करत, शिवसेना आणि विश्व हिंदू परिषदेच्या वतीने निषेध करणारे निवेदन उपजिल्हाधिकारी यांना दिले.या प्रसंगी बोलतांना शिवसेनेचे जिल्हाप्रमुख बालाजी रेड्डी यांनी स्पष्ट केले की, भविष्यात शिवसैनिकांवर हल्ले सहन करणार नाही. त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील. निवडणुकीच्या पूर्वसंध्येला शिवसैनिकांना दबावाखाली आणण्यासाठी तसेच त्यांना कार्यापासून परावृत्त करण्याच्या दुष्ट हेतूने कोणी दबाव टाकत असेल तर तो दबाव मोडीत काढून निर्भीडपणे काम करण्याची हिम्मत प्रत्येक शिवसैनिकाला दिली जाईल. शिवसेनेचे उदगीर तालुका प्रमुख चंद्रकांत टेंगेटोल यांना इजा पोहोचावी, या उद्देशाने त्यांच्या गाडीवर कोणत्यातरी हत्याराने हल्ला करून गाडीच्या काचा फोडून नुकसान केले आहे. यासंदर्भात अज्ञात आरोपींना पोलीस प्रशासनाने लवकरात लवकर शोधून कठोर शिक्षा द्यावी. अशीही मागणी शिवसेनेच्या वतीने यावेळी करण्यात आली.

 सदरील निवेदनाच्या प्रसंगी श्रीमंत सोनाळे, विलास खिंडे, सतीश पाटील हीप्पळगावकर, सचिन साबणे, अरुणाताई लेंडाणे, चंद्रकांत शिंदे, सुधीर पाटील, बाळू वडले, रामदास काकडे, नामदेव पवार, अंकुश कोनाळे, शैलेश वडगावे, विक्रम घोगरे, अंकुश ताटपल्ले, दिनेश देशमुख, रवी घोगरे, विशाल सूर्यवंशी, गुणवंत बीरगे, हनुमंत इंगळवाड, सुनील पाटील, बापुराव कदम, व्यंकट साबणे, शिवकांत चटनाळे, सावन क्रांती कुमार टंकसाळे, संदीप मोहटे, यशवंत ठाकरे, रवी बनसोडे, अर्जुन आटोळकर, बालाजी भंडे, कैलास कापसे, संदीप पेठे, प्रदीप गायकवाड, अरविंद शिंदे, कृष्णा वाडेकर, कृष्ण बिरादार इत्यादी शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. याप्रसंगी शिवसैनिकांना मार्गदर्शन करताना शिवसेनेचे जिल्हाप्रमुख बालाजी रेड्डी यांनी शिवसैनिकांना तसेच विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांना आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या संदर्भात हिम्मत दिली. आपण लोकांचे प्रश्न सोडवा. येणारी सत्ता आपलीच असेल. असा विश्वास बोलून दाखवला. या प्रसंगी सूत्रसंचालन व आभार शिवसेनेचे तालुकाप्रमुख चंद्रकांत टेंगेटोल यांनी केले.

About The Author