अहमदपूरमध्ये पूर्ववैमनस्यातून तरुणाची निर्घृण हत्या; ६ जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा, फरार आरोपींच्या शोधासाठी पथके रवाना

0
अहमदपूरमध्ये पूर्ववैमनस्यातून तरुणाची निर्घृण हत्या; ६ जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा, फरार आरोपींच्या शोधासाठी पथके रवाना

{"remix_data":[],"remix_entry_point":"challenges","source_tags":["local"],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{"transform":1},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":true,"containsFTESticker":false}

​अहमदपूर ( गोविंद काळे): शहरात पूर्ववैमनस्यातून एका २६ वर्षीय तरुणाची चाकू आणि काठीने वार करून निर्घृण हत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. या प्रकरणी अहमदपूर पोलीस ठाण्यात सहा जणांविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ च्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, दोन आरोपी जखमी अवस्थेत रुग्णालयात उपचार घेत आहेत, तर चार फरार आरोपींच्या शोधासाठी पोलिसांनी पथके रवाना केली आहेत.

​फिर्यादी उमेर खाजामौनोदीन बागवान आणि मयत शोएब इसाक बागवान (वय २६ वर्ष, रा. बागवान गल्ली) हे रविवारी (दि. २१) रात्री ९:०० वाजण्याच्या सुमारास अबुबकर किराणा दुकानाच्या बाजूला बोलत थांबले होते. यावेळी मागील भांडणाची कुरापत काढून सहा आरोपींनी संगनमत करून त्यांच्यावर हल्ला केला. आरोपींनी उमेर आणि शोएब यांना जीवे मारण्याच्या उद्देशाने चाकू आणि काठीने बेदम मारहाण केली. या हल्ल्यात गंभीर जखमी झाल्यामुळे शोएब बागवान याचा जागीच मृत्यू झाला.
​पोलिसांनी या प्रकरणी खालील सहा जणांविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे:
१. सिकंदर खलील शेख

२. समीर खलील शेख

३. आमीर खलील शेख

४. कलीम खलील शेख

५. गणीबी शेख

६. मालन बबलू शेख (सर्व रा. अहमदपूर)

​या सहा आरोपींपैकी दोन आरोपी गंभीर जखमी असल्यामुळे त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत, तर उर्वरित चार आरोपी फरार असून त्यांच्या शोधासाठी पोलिसांची विशेष पथके रवाना करण्यात आली आहेत.

​ अहमदपूर पोलीस ठाण्यात सदरील आरोपीविरुध्द गुन्हा रजि. नं. ८३०/२०२५ अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ च्या कलम १०३(१), ११८(२), १८९(२), १९१(२), १९१(३), १९०, ३५१(२)(३) आणि ३५२ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

​वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची घटनास्थळी भेट
​घटनेचे गांभीर्य ओळखून लातूरचे पोलीस अधीक्षक अमोल तांबे आणि पोलीस उपअधीक्षक मंगेश चव्हाण यांनी अहमदपूर पोलीस ठाण्याला भेट देऊन तपासाची सविस्तर माहिती घेतली. अधिकाऱ्यांनी रात्री उशिरापर्यंत अहमदपूरमध्ये थांबून घटनास्थळाची पाहणी केली.

​उपविभागीय पोलीस अधिकारी अरविंद रायबोले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विनोद मेत्रेवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष केदासे, पोलीस उपनिरीक्षक रवी बुरकुले, आनंद श्रीमंगल, स्मिता जाधव व कर्मचारी हनुमंत आरदवाड, तानाजी आरदवाड, बबन चपडे, चालक केंद्रे , राहुल कांबळे, भोपळे, पद्माकर पांचाळ, सतीष चव्हाण होमगार्ड जावेद आदी सह तातडीने घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक केदासे करत आहेत.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

बसस्थानकातील गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील दागिने चोरणाऱ्या महिलेकडून आणखी तीन तोळे सोने जप्त, पाच गुन्हे उघड.‎‎ लातूर (एल पी उगिले) जिल्ह्यातील विविध बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या टोळीवर स्थानिक गुन्हे शाखा, लातूर यांनी प्रभावी कारवाई करत एका महिला आरोपीस अटक करून तिच्याकडून चोरीस गेलेले सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. या कारवाईमुळे औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर येथील बसस्थानक परिसरात घडलेल्या चोरीच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत.‎लातूर जिल्ह्यातील मालमत्तेविषयक गुन्ह्यांवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे यांनी कडक निर्देश दिले आहेत. त्या अनुषंगाने अपर पोलीस अधीक्षक श्री. मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पथक सातत्याने गस्त व माहिती संकलन करून गुन्हे उघडकीस आणण्याचे काम करत आहे.‎ सदर पथकाने दिनांक 5 मार्च रोजी पुनम जितू कांबळे (वय ३४ वर्षे, रा. गांधीनगर, उदगीर, जि. लातूर) हिला ताब्यात घेऊन तिच्याकडून एक सोन्याचे मणी मंगळसूत्र व एक सोन्याची साखळी असा अंदाजे १३ ग्रॅम ३९० मिली वजनाचा सोन्याचा मुद्देमाल हस्तगत केला होता. पुढील तपासासाठी तिला पोलीस ठाणे औसा यांच्या ताब्यात देण्यात आले होते.‎ तपासादरम्यान आरोपी पुनम कांबळे हिने तिची साथीदार अनिता विशाल कांबळे (रा. गांधीनगर, उदगीर) हिच्यासह मागील चार ते पाच महिन्यांपासून औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर बसस्थानक परिसरात बसमध्ये चढणाऱ्या प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेत महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी केल्याची कबुली दिली. ‎त्यावरून नमूद महिला आरोपी पुनम जितू कांबळे यास पुढील तपास कामी पोलीस ठाणे अहमदपूर यांचे ताब्यात देण्यात आले. दरम्यान पोलीस ठाणे अहमदपूर व स्थानिक गुन्हे शाखा यांच्या संयुक्त पथकाने तपास करून पोलीस ठाणे अहमदपूर येथे दाखल असलेल्या सोनसाखळी चोरीच्या आणखी तीन गुन्ह्यांतील जवळपास तीन तोळे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहे.‎याप्रमाणे सदर कारवाईत आरोपी कडून एकूण जवळपास 4.3 तोळे सोन्याचे दागिने, सध्याच्या बाजारभावा नुसार अंदाजे 6 लाख 50 हजार रुपये किमतीचा सोन्याच्या दागिन्याचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एकूण पाच गुन्हे उघडकीस आणण्यात लातूर पोलिसांना यश आले आहे.ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस ठाणे अहमदपूर यांच्या संयुक्त पथकाने पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर व पोलीस निरीक्षक विनोद मेत्रेवार यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रमोद देशमुख, पोलीस अंमलदार संजय कांबळे, सूर्यकांत कलमे, राजेश कंचे, मोहन सुरवसे, विजय पाटील, तुळशीराम बरुरे, पाराजी पुटेवाड, हरी पतंगे, चंद्रकांत केंद्रे, महिला पोलीस अंमलदार सुरेखा मदने, अंजली गायकवाड तसेच पोलीस ठाणे अहमदपूर येथील पोलीस अंमलदार बी. पी. साळवे व जायभाये यांनी केली आहे.‎बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन होणाऱ्या चोरीच्या घटनांवर आळा घालण्या साठी लातूर पोलीस दल सातत्याने दक्ष आहे. नागरिकांनी प्रवास करताना आपल्या मौल्यवान वस्तूंबाबत विशेष काळजी घ्यावी तसेच संशयास्पद व्यक्ती आढळल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यास माहिती द्यावी, असे आवाहन लातूर पोलिसांकडून करण्यात आले आहे.

error: Content is protected !!