लोहारा मतदारसंघातून जनार्धन पाटलाची उमेदवारी राहणार

0
लोहारा मतदारसंघातून जनार्धन पाटलाची उमेदवारी राहणार

उदगीर (एल पी उगिले)
उदगीर तालुक्यातील शेतकरी संघटनेचे झुंजार नेते एक प्रतिष्ठित व्यापारी असून देखील शेतकऱ्यांचे हित जोपासणारे जनार्दन पाटील हे केवळ शेतकऱ्यांच्या, कष्टकऱ्यांच्या हितासाठी निवडणुकीच्या मैदानात शेतकरी संघटनेच्या वतीने उतरत आहेत अशी माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी दिली आहे.
यासंदर्भात आमच्या प्रतिनिधीने त्यांना विचारले असता त्यांनी स्पष्ट केले की, सध्याच्या शासनामधील शेतकऱ्यांच्या संदर्भातील जी राजकीय भूमिका आहे, ती अत्यंत चुकीची आहे. शेतकरी विरोधी कायदे शेतकऱ्यांना मरायला भाग पाडत आहेत. आज शेतकऱ्यांच्या आत्महत्या प्रचंड वाढल्या आहेत. याला एकमेव कारण म्हणजे ही प्रशासनाची व्यवस्था आहे. ही व्यवस्था बदलण्यासाठी पहिल्यांदा शेतकरी विरोधी कायदे बदलले पाहिजेत, या दृष्टीने मी प्रयत्न करणार आहे.
जिल्हा परिषदेच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे हक्क जोपासत असतानाच शेतकऱ्यांच्या हिताच्या ज्या ज्या योजना आहेत, मग त्या केंद्र शासनाच्या असतील किंवा राज्य शासनाच्या असतील त्या दलाला विना राबवल्या गेल्या पाहिजेत. कारण प्रत्यक्ष लाभार्थ्यापेक्षा दलालांना पोसणारे लोक जास्त झाले आहेत. कित्येक लोकप्रतिनिधींनी दलालांना पुढे करत आहेत. हे थांबले पाहिजे. यासाठी मी संघर्ष करेन. केवळ आणि केवळ शेतकरी, कष्टकरी, सर्वसामान्य माणसाचे हित झोपायण्यासाठी मी प्रयत्न करीन. त्यासाठीच मी निवडणुकीच्या मैदानात उतरत आहे. असे जनार्दन पाटील यांनी स्पष्ट केले आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!