नेत्रतपासणीच नाहीतर समाजातील गोरगरिबांच्या सेवेसाठी सतत तत्पर- राजूरकर

नेत्रतपासणीच नाहीतर समाजातील गोरगरिबांच्या सेवेसाठी सतत तत्पर- राजूरकर

 उदगीर (एल.पी.उगीले) : समाजातील सर्व गोरगरिबांची सेवा करायचा संकल्प अर्ध्य फाउंडेशनने केला असून त्याचाच एक भाग म्हणून शिवाजीनगर तांडा येथे नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन केलेले आहे. असे स्पष्टीकरण फाउंडेशनचे अध्यक्ष प्रमोद राजूरकर यांनी या कार्यक्रमाच्या प्रसंगी सांगितले. अर्ध्य फाउंडेशन आणि लायन्स क्लब उदगीर यांच्या संयुक्त विद्यमानाने शिवाजीनगर तांडा येथे नेत्र चिकित्सा शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरासाठी प्रमुख पाहुणे विश्‍व हिंदू परिषदेचे प्रांत सहसेवा प्रमुख संतोष कुलकर्णी, फाउंडेशनचे अध्यक्ष प्रमोद राजूरकर, उपाध्यक्ष श्रीपाद करंजीकर, कोषाध्यक्ष संजय कुलकर्णी, सहकोषाध्यक्ष विष्णू कुलकर्णी, सचिव संतोष जोशी हे मान्यवर उपस्थित होते. या नेत्रचिकित्सा शिबिरासाठी लायन्स क्लब उदगीर च्या वतीने डॉ. विष्णू पवार, डॉ. बिरादार हे उपस्थित होते. आपल्यासारख्या तांड्यावर येऊन आपली सेवा करण्याचा संकल्प या मान्यवरांनी केला म्हणून ग्रामस्थांच्यावतीने रघुनाथ आडे, अनिल सोनकांबळे, प्रदीप राठोड, निलेश गडकर व ग्रामपंचायत सदस्यांच्या वतीने या मान्यवरांचे स्वागत करण्यात आले,सत्कार करण्यात आला. त्या स्वागत आणि सत्काराच्या नंतर बोलताना राजूरकर यांनी स्पष्ट केले की, आमच्या फाउंडेशनचा मूळ उद्देशच “सेवा परमो धर्म:” असा असून त्यादृष्टीने गोरगरिबांची सेवा करावी, आपल्या वतीने समाजातील सर्व घटकांचा विचार करून त्यांच्यासाठी जे जे म्हणून करता येईल ते ते करण्याचा संकल्प असल्यामुळे आमच्या फाऊंडेशनचे सर्वच सदस्य समाज हितासाठी कार्य करताना दिसतील, असे सांगितले. संयोजकांच्या वतीने आभार प्रदर्शन करण्यात आले.

About The Author