मांजरा परिवाराला महिनाअखेरपर्यंत अल्टिमेटम- आ. रमेश आप्पा कराड

मांजरा परिवाराला महिनाअखेरपर्यंत अल्टिमेटम- आ. रमेश आप्पा कराड

लातूर (एल.पी. उगिले) : मांजरा परिवारातील सर्व सहकारी साखर कारखान्यांनी शासनाच्या निर्धारित दराप्रमाणे शेतकऱ्यांना ऊस बिलाचे हप्ते द्यावेत. या आग्रही मागणीसाठी क्रांती दिनाचे औचित्य साधून भारतीय जनता पार्टीच्या वतीने मांजरा सहकारी साखर कारखान्याच्या गेटसमोर आंदोलन केले. या आंदोलकांना उद्देश बोलताना कारखाना प्रशासनाने महिना अखेरपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा करावी, अन्यथा मराठवाडा मुक्ती दिनाच्या दिवशी तीव्र आंदोलने केली जाईल. असा इशारा क्रांती दिनाच्या निमित्ताने भाजपाचे जिल्हाध्यक्ष तथा आमदार रमेश आप्पा कराड यांनी दिला.भाजपानेते आ. रमेशअप्पा कराड यांच्या नेतृत्वात मांजराच्‍या इतिहासात पहिल्‍यांदाच शेतकरी आंदोलनास मोठा प्रतिसाद मिळाला.

पुढे बोलतांना आ.कराड म्हणाले, असंख्‍य शेतकाऱ्याचे संसार ऊसाच्‍या पिकावर अवलंबून आहेत. आम्‍ही कोणाच्‍या व्‍यक्‍तीगत विरोधात नाहीत. रात्रंदिवस काबाड कष्‍ट करून मुलाप्रमाणे सांभाळलेल्‍या ऊसाच्‍या पिकाला हक्‍काने शासनाच्‍या नियमानुसार भाव मागतोय, भिक मागत नाहीत. जोपर्यंत एफआरपी प्रमाणे भाव मिळणार नाही. तोपर्यंत स्‍वस्‍थ बसणार नाही. असे सांगून येत्‍या ३० ऑगस्‍ट पर्यंत मांजरा परिवारातील साखर कारखान्‍यांनी गाळप केलेल्‍या ऊसाची रक्‍कम एफआरपी प्रमाणे व्‍याजासह शेतकऱ्याच्‍या खात्‍यावर जमा करावी. अन्‍यथा १७ सप्‍टेंबर २०२१ मराठवाडा मुक्‍तीसंग्राम दिनी आक्रमाकपणे आंदोलन केले जाईल. असा इशारा भाजपाचे जिल्‍हाध्‍यक्ष आ. रमेशअप्‍पा कराड यांनी मांजरा कारखान्‍यासमोर शेतकरी आंदोलनात बोलताना दिला.

            मांजरा परिवारातील मांजरा, विलास आणि रेणा या साखर कारखान्‍यांनी गाळप केलेल्‍या ऊसाला आतापर्यंत आदा केलेली आणि एफआरपी प्रमाणे होणारी रक्‍कम यातील फरकाची रक्‍कम शेतकऱ्यांना देण्‍यात यावी. या मागणीसाठी भाजपाचे जिल्‍हाध्‍यक्ष आ. रमेशअप्‍पा कराड यांच्‍या नेतृत्‍वाखाली ९ ऑगस्‍ट क्रांतीदिनी मांजरा साखार कारखान्‍यासमोर शेतकरी आंदोलन करण्‍यात आले. मांजरा कारखान्‍याच्‍या इतिहासात पहिल्‍यांदाच शेतकऱ्यांनी आपल्‍या न्‍याय हक्‍काच्‍या मागणीसाठी आंदोलन केले. या आंदोलनात मांजरा परिवारातील कारखान्‍याच्‍या कार्यक्षेत्रातील ऊस उत्‍पादक शेतकाऱ्यासह भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते मोठया संख्‍येनी सहभागी झाले होते. आंदालनकर्त्‍यांनी या वेळी दिलेल्‍या विविध घोषणांनी परिसर दणाणून सोडला होता.

                या आंदोलनस्‍थळी भाजपा किसान आघाडीचे प्रदेश सरचिटणीस दिलीपराव देशमुख, माजी आमदार शिवाजीराव पाटील कव्‍हेकर, प्रदिप पाटील खंडापूरकर, भाजपाचे संजय दोरवे, किरण उटगे,

बाबु खंदाडे, शिवाजीराव केंद्रे , रामचंद्र तिरूके, अशोककाका केंद्रे, रोहिदास वाघमारे, गोविंद चिलकुरे, स्‍वाती जाधव, प्रेरणा होनराव, मनिष बंडेवार, ज्ञानेश्‍वर चेवले, मुक्‍तेश्‍वर वागदरे, राजकुमार कलमे, अनिल भिसे, आप्‍पा मुंडे, विक्रम शिंदे, प्रदिप मोरे, सुर्यकांत शेळके, बाबासाहेब घुले, सुरज शिंदे, काकासाहेब मोरे, अमोल पाटील,सुरेंद्र गोडभरले,संतोष वाघमारे,शैलेश गोजमगुंडे,भागवत सोट,विजय काळे,हणमंतबापु नागटिळक,उषा रोडगे,ललीता कांबळे,दीलीप धोत्रे,धनराज शिंदे,शरद दरेकर,भैरवनाथ पिसाळ,अशोक बिराजदार,गोवींद मुंडे,विनायक मगर,श्रीकृष््ण मोटेगावकर,वैभव सापसोड,अनंत कणसे,अभिषेक आकनगीरे,रशीद पठाण,साहेबराव मुळे,बन्सी भिसे!दशरथ सरवदे,किरण मुंडे,पांडुरंग बालवाड,रमाकांत फुलारी इत्यादी उपस्थित होते.

About The Author