नागापूरात बिबटयाची दहशत; परिसरातील श्वान फस्त
निफाड/नाशिक (रोहित टोम्पे ) : निफाड तालुक्यातील नागापूर शिवारात व नागापूर गावालगत च्या काही भागात बिबट्या ने नागरिकांना दर्शन दिले आहे. त्यामुळे परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे या ठिकाणी पिंजरा लावण्याची मागणी नागरीकांनी केली आहे. बिबट्याचा संचार करत असल्याने येथील नागरिकांना रात्रीच्या वेळी बाहेर फिरणे अवघड झाले आहे. तसेच मागील आठवड्यात गोरख जमधडे, संदीप गडाख यांना दिसल्याने, तसेच परीसरात शेळ्या व कुत्रे वर हल्याचे प्रमाण वाढल्याने परिसरात दहशत निर्माण झाली आहे. तसेच नागापूर शिवारात तिने बिबटे असल्यची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली आहे नागापूर येथे ऊस क्षेत्र मोठया प्रमाणत आहे.व उसाची शेती हे बिबटया साठी लपण्याचे क्षेत्र आहे. या घटनांचा शेती कामावर परिणाम होत आहे. संध्या शेतीची कामे सुरू असल्याने महिला व मजूरा मध्ये भीतीचे वातावरण आहे रात्रीच्या वेळी घरातुन बाहेर पडणेही मुश्किल झाले आहे. तरी या घटनेची वनविभागाणे गंभीर दखल घ्यावी. बिबट्याचा कामयचा बंदोबस्त करावा अशी मागणी स्थानिक नागरिक करत आहे.