आ. बाबासाहेब पाटील यांनी जनता दरबारात फक्त तिन मिनिटात सोडविला तीन वर्षापुर्वीचा प्रश्न
सुनेगाव, शेंद्री, शेनी या तीन गावचा आर.ओ प्लांट तात्काळ सुरू करण्याच्या दिल्या सुचना
अहमदपूर (गोविंद काळे) : चाकूर तालुक्याचे आमदार बाबासाहेब पाटील यांनी दि ०९ ऑगस्ट रोजी वार सोमवार तहसील कार्यालय अहमदपूर येथे जनता दरबार भरवला होता. त्यावेळी ग्रामपंचायत सुनेगाव शेनी शेंद्री येथील जनतेच्या अनेक समस्या घेऊन गोपीनाथ जायभाये आमदार यांना भेटले आमदारांनी सर्व प्रश्न व्यवस्थित समजावून घेतले. यामध्ये प्रामुख्याने तिन्ही गावाच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न हा अतिशय निकडीचा होता सुनेगाव, शेंद्री, शेनी या तिन गावामध्ये साधारणतहा: अडीच ते तिन वर्षापासुन तीन्ही गावात आर ओ प्लांट फक्त नावाला बसवले आहेत त्यातून शुद्ध पाणी गावाला मिळत नाही. ही बाब आमदार यांना अवगत करून देताच लागलीच आमदारांनी आर ओ प्लांट बसवलेल्या व्यक्तीला याबाबत विचारणा केली असता त्यांची पुरती भंबेरी उडाली. कसल्याही परिस्थितीत उद्याच्या उद्याच प्लांट दुरुस्ती करून देण्याची सुचना केली पावसाळ्यात नागरिकांचे आरोग्य अशुद्ध पाण्यामुळे बिघडू नये म्हणून आर ओ प्लांट दुरुस्ती आवश्यक आहे. आमदारांनी यापूर्वी सूचित केल्याप्रमाणे गावात असलेल्या विजेच्या अडचणी मार्गी लावण्यासाठी गावपातळीवरून सरपंच यांच्याकडून आवश्यक त्या मार्गदर्शक सूचना मागवल्या आहेत. त्याबाबतही आमदारांनी तिन्ही गावच्या विजेसंदर्भात अडचणी सांगितल्या आहेत. त्या तात्काळ मार्गी लावण्याचे आश्वासन दिले आहे. यावेळी आमदारांनी सर्व समस्या ऐकून घेऊन त्या सर्वांच्या सर्व तात्काळ निकाली काढण्याचे आश्वासन दिले आहे.
यावेळी मा. नायब तहसिलदार बबिता आळंदे मॅडम ,जि. प सदस्य माधव जाधव साहेब, युवक जिल्हा कार्याध्यक्ष प्रशांतभाऊ भोसले, नगरसेवक अभयजी मिरकले, चिलखा गावचे चेअरमन शिंदे, समाजसेवक राम जायभाये,पत्रकार बालाजी काळे, पत्रकार गोविंद काळे, गोपाळ काळे, बाबासाहेब पाटील यांचे स्विय सहाय्यक धनंजयभाऊ जाधव, गणेश जाधव आदींची उपस्थिती होती.! ग्रामपंचायत कार्यालय सुनेगाव, शेनी, शेंद्री येथील ग्रामस्थांच्या वतीने आमदार बाबासाहेब पाटील यांनी गावच्या समस्या ऐकून घेतल्या बद्दल त्यांचे मनःपूर्वक आभार मानले.