दलितांवरील वाढत्या अन्याय अत्याचाराच्या घटनांना पायबंद घाला..!
युवकनेते डॉ.सिध्दार्थकुमार सूर्यवंशी यांची राष्ट्रीय अनूसूचीत जाती आयोगाकडे मागणी
अहमदपूर (गोविंद काळे) : महाराष्ट्र राज्यात अनूसूचीत जातींच्या व्यक्तीवर गेल्या कांही वर्षात मोठ्या प्रमाणात अन्याय अत्याचाराच्या घटना घडल्या असून आयोगाने यात स्वतः होवून लक्ष घालावे आणी अशा घटना होणार नाहीत याची दक्षता घ्यावी अशी मागणी युवकनेते डॉ.सिध्दार्थकुमार सूर्यवंशी यांनी राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचे अध्यक्ष विजयजी सांपला यांची भेट घेवून एका निवेदनाद्वारे केली आहे.
आज दिल्ली येथे आयोगाच्या राष्ट्रीय कार्यालयात या मागणीचे निवेदन देण्यात आले.या निवेदनात पूढे म्हटले आहे की,अनूसूचीत जातींच्या लोकांवर अन्याय अत्याचाराच्या घटना घडूनये या साठी अट्राॅसिटी कायद्याची तरतूद आहे.मात्र यंत्रनेच्या दूर्लक्ष पक्षपाती भूमिकेमूळे अनेक ठिकाणी अट्राॅसिटी कायद्याची कठोर अंमलबजावणी करण्यात जाणीवपूर्वक दिरंगाई व दूर्लक्ष केले जाते.अट्राॅसिटी कायद्या अंतर्गत तक्रार दिल्या नंतर फिर्यादीवर दरोड्या सारखे खोटे गंभीर गुन्हे नोंद केले जातात.त्या मूळे कायदा असूनसुद्धा अनूसूचीत जातीतील लोकांना न्याय मिळेनासे झाला आहे अशी भावना निर्माणहोत आहे. त्यामूळे महाराष्ट्र राज्यात अट्राॅसिटी कायद्याची कठोर अंमलबजावणी करावी तसेच फिर्यादीवर खोटे गुन्हे नोंद केले जावू नये.ठिकठिकानी दाखल असलेले खोटे गुन्हे तातडीने रद्द करावेत. असे खोटे गुन्हे नोंद होणार नाहीत या बाबत स्पष्ट निर्देश देण्यात यावे.
तसेच महाराष्ट्र राज्यात अनूसूचीत जातींच्या लोकांवर सातत्याने मोठ्या प्रमाणात अन्याय अत्याचाराच्या घटना वाढल्या आहेत. जातीय भावनेतून राज्यात अन्याय अत्याचाराच्या घटना घडणार नाहीत यासाठीच्या उपाययोजना तातडीने करण्याबाबत आयोगा मार्फत कार्यवाही करावी. या निवेदनावर पत्रकार अजय भालेराव याचे नांवे आहेत.