बोथी आणि बोथी तांड्याची जनता उघड्यावर शौचालय करण्यात जोमात, सकाळचे गुड मॉर्निंग पथक कोमात

बोथी आणि बोथी तांड्याची जनता उघड्यावर शौचालय करण्यात जोमात, सकाळचे गुड मॉर्निंग पथक कोमात

चाकूर (सुनिल जाधव) : जिल्हा परिषद स्वच्छ भारत अभियानांतर्गत तालुक्यातील ग्रामीण भागात खेडेगावातील होत असलेली हागणदारी मुक्तीची लाजिरवाणी प्रथा ही कायमस्वरूपी बंद व्हावी याकरिता शासनस्तरावरून जनजागृतीसाठी प्रयत्न केले जात असून नागरिकांना शौचालयाची सवय लागावी म्हणून स्वच्छ भारत अभियानांतर्गत गुड मॉर्निंग पथक नेमण्यात आले होते. परंतु प्रशासनाच्या उदासीन धोरणांमुळे व लोकसहभागाचा अभाव असल्याने गुड मॉर्निंग पथक कोमात गेल्याचे आज बोथी आणि बोथी तांडा या ग्रामीण भागात चित्र दिसून आले. परंतु गावात आलेल्या गुड मॉर्निंग पथकास स्थानिक लोकांचा विरोध असल्याने हो बऱ्याच काही लोकांना ग्रामस्थांचा सहकार्य असल्याने त्यांच्यामध्ये रोष निर्माण होत आहे. प्रशासनाच्या वतीने ही मोहीम गुंडाळण्यात आलेले चित्र बोथी आणि बोथी तांडा या दोन्ही गावांतील परिस्थितीवरून दिसून येत आहे. नागरिकांचे आरोग्य हे चांगले निरोगी राहावे, त्याच बरोबर डेंगू,मलेरिया,चिकनगुनिया यासारख्या साथीच्या रोगाची सध्या गावांमध्ये मोठ्या प्रमाणात साथ पसरलेली दिसून येत आहे तरी या साथीच्या रोगाला आळा बसवण्यासाठी ग्रामपंचायतीने बोथी व बोथी तांडा या दोन्ही गावांमध्ये जंतुनाशक फवारणी करण्याचे या गावातील जनतेतून चर्चा होत आहे.या गावांतील घाणीचे साम्राज्य कमी होण्यासाठी देशव्यापी सच्छ भारत अभियान अंतर्गत शौचालय बांधण्याकरिता शासनाने अनुदान दिले ज्यामुळे घरोघरी शौचालय बांधण्यात आले.परंतु त्याचा वापर होणे आवश्यक असल्याने या गावांतील ग्रामस्थांकडून शौचालयांचा वापर होत नसल्याचे चित्र दिसून येत आहेत, बोथी व बोथी तांडा या दोन्ही गावांत प्रवेश करताना रस्त्याच्या दोन्ही दुतर्फा घाणीच्या साम्राज्याने पसरले असल्याने गावात दुर्गंधी निर्माण झाली आहे. त्यामुळे ग्रामस्थांचे आणि लहान बालकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.याच्या सुरुवातीला ज्या स्वच्छता अभियानाचा एक भाग म्हणून सकाळी उघड्यावर शौचालयांस जाणाऱ्यांना गुड मॉर्निंग पथकाची धास्ती असल्याकारणाने ग्रामस्थांकडून शौचालयांचा वापर होत होता.परंतु आता त्याच प्रकारची भीती ग्रामस्थांच्या मनात राहिली नाही म्हणून उघड्यावर शौचालय करणार्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. याबाबत स्थानिक प्रशासनांकडून कोणत्या प्रकारची दखल घेत नसल्याने उघड्यावर शौचालयास जाणाऱ्यांची संख्या जास्त आहे,तरी पुर्वी प्रमाणेच गुड मॉर्निंग पथकाकडून अशा ग्रामस्थांवर दंडात्मक कारवाई करण्याची मागणी बोथी व बोथी तांड्यातील काही सुज्ञ व सुशिक्षित ग्रामस्थांकडून होत आहे. सध्या पावसाळा सुरू असल्याने आता बोथी आणि बोथी तांडा या दोन्ही गावांमध्ये प्रवेश करताना किंवा बाहेर जाताना दुर्गंधी सुटत असल्याने गावकऱ्यांना व पाहुणे रावळे मंडळींना नाकाला आणि तोंडाला रुमाल लावून जावे लागत आहे.शौचालय बांधलेले दाखवून अनुदान मिळवून घेतलेले जे काही ग्रामस्थ आहेत आणि जे काही शौचालयांचा वापर करत नाहीत आणि उघड्यावर शौचास बसणाऱ्या लोकांची कसून चौकशी करून योग्य ती दंडात्मक कारवाई करण्यात यावी आणि बोथी व बोथी तांडा येथील रोगराईचा प्रादुर्भाव रोखण्यास प्रशासनाने सहकार्य करावे अशी मागणी या दोन्ही गावांतील काही सुज्ञ व सुशिक्षित युवा नेतृत्व करणाऱ्या काही ग्रामस्थांकडून मागणी केली जात आहे.

About The Author