महात्मा फुले महाविद्यालयास यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाकडून एन.एस.एस.चे युनिट मंजूर

महात्मा फुले महाविद्यालयास यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाकडून एन.एस.एस.चे युनिट मंजूर

अहमदपूर (गोविंद काळे) : येथील महात्मा फुले महाविद्यालयास राष्ट्रीय सेवा योजना (एन.एस.एस.) चे पन्नास विद्यार्थ्यांच्या युनिटला यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिकने मान्यता दिली आहे. याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या अभ्यास केंद्राने मुक्त शिक्षण क्षेत्रात उत्तुंग भरारी घेतली आहे . त्याची दखल घेऊन व किसान शिक्षण प्रसारक मंडळ उदगीरच्या सर्व सन्मानिय पदाधिकाऱ्यांनी केलेल्या सहकार्यामुळे आणि प्राचार्य डॉ . वसंत बिरादार पाटील यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे ही मान्यता मिळाली आहे. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. ई. वायुनंदन, कुलसचिव डॉ. दिनेश भोंडे, विद्यार्थी विकास मंडळाचे संचालक डॉ. प्रकाश देशमुख आणि नांदेड विभागीय केंद्राचे संचालक डॉ. बी.के. मोहन, सहायक कुलसचिव डॉ‌. चंद्रकांत पवार यांनी अद्वितीय सहकार्य केल्यामुळे महात्मा फुले महाविद्यालच्या अभ्यास केंद्रास हे राष्ट्रीय सेवा योजनेच्या या पन्नास विद्यार्थ्यांच्या युनिटला मान्यता दिल्याबद्दल अभ्यास केंद्राचे संयोजक डॉ. अनिल मुंढे व केंद्र सहसंयोजक डॉ . संतोष पाटील यांनी सर्वांचे आभार मानले.

चौकट
विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्वाला आकार देणारी योजना – डॉ.प्रकाश देशमुख
ज्या थोर समाज सुधारकांच्या नावाने अहमदपूरचे महात्मा फुले महाविद्यालय चालते त्या महाविद्यालयातील यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या अभ्यासकेंद्रास एन.एस.एस. चे युनिट मंजूर झाले आहे. त्या मार्फत हे अभ्यास केंद्र अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून अव्वल स्थानावर राहिल याची खात्री आहे.
य. च. म. मु. वि. नाशिकने मंजूर केलेल्या या एन. एस. एस. विभागाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्वाला आकार देऊन, सामाजिक बांधिलकी मानून समाजिक परिवर्तन या महात्मा फुले महाविद्यालयाच्या अभ्यास केंद्राकडून होईल अशी अपेक्षा.

चौकट
नाविन्यपूर्ण उपक्रम राबविणारे महात्मा फुलेचे अभ्यासकेंद्र – डॉ.बी.के.मोहन
अहमदपूरचे महात्मा फुले महाविद्यालय हे नांदेड विभागीय केंद्रांतर्गत क्रियाशील असलेल्या अभ्यास केंद्रापैकी एक केंद्र आहे. या अभ्यासकेंद्राने या. च.म. मु. वि. च्या विद्यार्थ्यांसाठी या पूर्वी भित्तीपत्र, स्नेहसंमेलन, वादविवाद स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम यासारखे अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून विद्यार्थ्यांना समाजाभिमुख बनविण्याची प्रक्रिया राबवून सामाजिक बांधिलकी जोपासून राष्ट्रीय एकात्मता वृद्धी केली आहे. या युनिट च्या माध्यमातून या महाविद्यालयातील अभ्यासकेंद्र पुन्हा नव्या जोमाने कार्यरत राहून या.च.म.मु.वि.नाशिक व नांदेड विभागाचे नावलौकिक करेल यात तिळमात्र शंका नाही.

चौकट
उपक्रमशिल महाविद्यालयास एन. एस. एस.चे युनिट मिळाल्याचं समाधान – डॉ.चंद्रकांत पवार सहाय्यक कुलसचिव
महात्मा फुले महाविद्यालयातील या.च.म.मु.वि.च्या उपक्रमशील अभ्यासकेंद्रास राष्ट्रीय सेवा योजनेचे ५० विद्यार्थ्याचे युनिट मंजूर झाले आहे. याचे समाधान आहे. हे या या अभ्यास केंद्राच्या कामाची पावती आहे.एन.एस.च्या माध्यमातून हे महाविद्यालय सामाजिक उपक्रम राबवले.तसेच विद्यार्थ्यांचा शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक विकास साधून देशाला एक आदर्श नागरिक देण्याचे या महाविद्यालयातील हे अभ्यास केंद्र एक ‘,केंद्र’ बनेल अशी अशा आहे.

About The Author