महात्मा फुले महाविद्यालय डॉ एस आर रंगनाथन यांची जयंती साजरी

महात्मा फुले महाविद्यालय डॉ एस आर रंगनाथन यांची जयंती साजरी

अहमदपुर (गोविंद काळे) : येथील महात्मा फुले महाविद्यालयात ग्रंथालय शास्त्राचे जनक डॉ. एस. आर. रंगनाथन यांची 129 वी. जयंती साजरी करण्यात आली. या बाबतचे सविस्तर वृत्त असे, महात्मा फुले महाविद्यालयाच्या ग्रंथालय विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ . वसंत बिरादार पाटील हे होते तर उपप्राचार्य डॉ. डी. डी. चौधरी यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी ग्रंथालयशास्त्राचे जनक डॉ .एस.आर. रंगनाथन यांच्या प्रतीमेचे पूजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन तथा प्रास्ताविक ग्रंथपाल प्रा. परमेश्वर इंगळे यांनी केले तर आभार सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ . बी.के. मोरे यांनी मानले. यावेळी महाविद्यालयातील प्राध्यापक, कार्यालयीन कर्मचारी व विद्यार्थी कोवीड – १९ च्या नियमाचे पालन करून उपस्थित होते.

About The Author

error: Content is protected !!