लातूरात शनिवारी ओबीसी, भटक्‍या विमुक्‍तांचा महामेळावा

लातूरात शनिवारी ओबीसी, भटक्‍या विमुक्‍तांचा महामेळावा

पंकजाताई मुंडे यांच्‍यासह अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत

लातूर (प्रतिनिधी) : भारतीय जनता पार्टीच्या वतीने कायद्यानं मिळालेलं आरक्षण राज्य सरकारच्या दूर्लक्षामुळे रद्द झालं याबाबत ओबीसी इतर मागासवर्गीयात जनजागृती करण्यासाठी आणि हक्काचे आरक्षण परत मिळवून घेण्यासाठी माजी ग्रामविकास मंत्री पंकजाताई मुंडे यांच्यासह अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत 14 ऑगस्ट 2021 रोजी लातूर येथे ओबीसी भटक्या विमुक्त जातीचा महाजागर महामेळावा आयोजित करण्यात आला असल्याची माहिती भाजपा ओबीसी मोर्चाचे प्रदेश कोषाध्यक्ष गोविंद चिलकुरे आणि जिल्हाध्यक्ष बापूराव राठोड यांनी दिली आहे.

आरक्षण मिळावे ही भाजपाची भूमिका असून मराठा, ओबीसी समाजाला मिळलेले आरक्षण राज्‍यातील महाविकास आघाडी सरकारने न्‍यायालयात व्‍यवस्थित बाजू मांडली नसल्‍याने रद्द झाले. घटनेने दिलेले ओबीसीच्‍या हक्‍काचे आरक्षण सन्‍मानाने परत मिळावे यासाठी आणि आरक्षणाबाबत जनजागृती व्‍हावी याकरीता लातूर जिल्हा भाजपा ओबीसी मोर्चाच्या वतीने 14 ऑगस्ट शनिवार रोजी सकाळी 11 वाजता लातूर येथे भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ. रमेशआप्पा कराड यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या ओबीसी आणि भटक्या विमुक्त जातींच्या महाजागर महामेळाव्याचे उद्घाटन भाजपाच्या राष्ट्रीय सचिव तथा माजी ग्रामविकास मंत्री पंकजाताई मुंडे यांच्या हस्ते होणार आहे.

या मेळाव्यास मार्गदर्शन करण्यासाठी कर्नाटक राज्य सरकारचे पशुसंवर्धन मंत्री ना. प्रभुजी चव्हाण, राज्यातील माजी जलसंधारणमंत्री राम शिंदे, जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आ. संभाजीराव पाटील निलंगेकर, माजी मंत्री आ. अतुल सावे, भाजपा ओबीसी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष योगेश टिळेकर, भाजपा अनुसूचित जाती जमाती मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष नरेंद्र पवार, भाजपा अनुसूचित जाती मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष सुधाकर भालेराव, लातूरचे खासदार सुधाकर शृंगारे, आ. तुषार राठोड, आ. अभिमन्यु पवार, भाजपाचे ज्येष्ठ नेते गोविंदअण्‍णा केंद्रे, माजी आमदार विनायकराव पाटील, प्रदेश प्रवक्ते गणेश दादा हाके, माजी आमदार शिवाजीराव पाटील कव्हेकर, किसान मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस दिलीपराव देशमुख, माजी आमदार पाशा पटेल, माजी आमदार बब्रुवान खंदाडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

लातूर येथील गिरवलकर मंगल कार्यालय बार्शी रोड जुनी रेल्वे लाईन याठिकाणी होणाऱ्या या महाजागर महामेळाव्यास ओबीसी आणि भटक्या विमुक्त जातीतील समाज बांधवांनी हजारोंच्या संख्येने उपस्थित राहावे असे आव्हान भाजपाचे जिल्हा संघटन सरचिटणीस संजय दोरवे भाजपा ओबीसी मोर्चाचे कोषाध्यक्ष गोविंद चिलकुरे, मराठवाडा संपर्क प्रमुख डॉ. बाबासाहेब घुले जिल्हाध्यक्ष बापुराव राठोड जिल्हा प्रभारी गोरोबा गाडेकर यांच्यासह अनेकांनी केले आहे.

सदरील महाजागर महामेळावा यशस्वी व्हावा यासाठी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहुल केंद्रे, रोहिदास वाघमारे, राम‍चंद्र तिरूके, त्र्यंबकआबा गुट्टे, शैलेश गोजमगुंडे, भागवत सोट, दिलीप धोत्रे, अशोककाका केंद्रे, देविदास काळे, बाबु खंदाडे, बाळासाहेब शिंगाडे, अभिषेक आकनगीरे, वसंतराव डिघोळे, सुरेंद्र गोडभरले, विजय काळे, सतिष अंबेकर, रमेश सोनवणे, बालाजी गुटे, वसंत करमुडे, प्रशांत पाटील, काशिनाथ ढगे, बालाजी केंद्रे, फुलचंद अंधारे, हणमंत देवकते, शिवाजी बैनगीरे, गोविंद नरहरे, पद्माकर चिंचोलकर यांच्‍यासह अनेकजण मेहनत घेत आहेत.

About The Author

You may have missed

बसस्थानकातील गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील दागिने चोरणाऱ्या महिलेकडून आणखी तीन तोळे सोने जप्त, पाच गुन्हे उघड.‎‎ लातूर (एल पी उगिले) जिल्ह्यातील विविध बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या टोळीवर स्थानिक गुन्हे शाखा, लातूर यांनी प्रभावी कारवाई करत एका महिला आरोपीस अटक करून तिच्याकडून चोरीस गेलेले सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. या कारवाईमुळे औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर येथील बसस्थानक परिसरात घडलेल्या चोरीच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत.‎लातूर जिल्ह्यातील मालमत्तेविषयक गुन्ह्यांवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे यांनी कडक निर्देश दिले आहेत. त्या अनुषंगाने अपर पोलीस अधीक्षक श्री. मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पथक सातत्याने गस्त व माहिती संकलन करून गुन्हे उघडकीस आणण्याचे काम करत आहे.‎ सदर पथकाने दिनांक 5 मार्च रोजी पुनम जितू कांबळे (वय ३४ वर्षे, रा. गांधीनगर, उदगीर, जि. लातूर) हिला ताब्यात घेऊन तिच्याकडून एक सोन्याचे मणी मंगळसूत्र व एक सोन्याची साखळी असा अंदाजे १३ ग्रॅम ३९० मिली वजनाचा सोन्याचा मुद्देमाल हस्तगत केला होता. पुढील तपासासाठी तिला पोलीस ठाणे औसा यांच्या ताब्यात देण्यात आले होते.‎ तपासादरम्यान आरोपी पुनम कांबळे हिने तिची साथीदार अनिता विशाल कांबळे (रा. गांधीनगर, उदगीर) हिच्यासह मागील चार ते पाच महिन्यांपासून औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर बसस्थानक परिसरात बसमध्ये चढणाऱ्या प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेत महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी केल्याची कबुली दिली. ‎त्यावरून नमूद महिला आरोपी पुनम जितू कांबळे यास पुढील तपास कामी पोलीस ठाणे अहमदपूर यांचे ताब्यात देण्यात आले. दरम्यान पोलीस ठाणे अहमदपूर व स्थानिक गुन्हे शाखा यांच्या संयुक्त पथकाने तपास करून पोलीस ठाणे अहमदपूर येथे दाखल असलेल्या सोनसाखळी चोरीच्या आणखी तीन गुन्ह्यांतील जवळपास तीन तोळे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहे.‎याप्रमाणे सदर कारवाईत आरोपी कडून एकूण जवळपास 4.3 तोळे सोन्याचे दागिने, सध्याच्या बाजारभावा नुसार अंदाजे 6 लाख 50 हजार रुपये किमतीचा सोन्याच्या दागिन्याचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एकूण पाच गुन्हे उघडकीस आणण्यात लातूर पोलिसांना यश आले आहे.ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस ठाणे अहमदपूर यांच्या संयुक्त पथकाने पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर व पोलीस निरीक्षक विनोद मेत्रेवार यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रमोद देशमुख, पोलीस अंमलदार संजय कांबळे, सूर्यकांत कलमे, राजेश कंचे, मोहन सुरवसे, विजय पाटील, तुळशीराम बरुरे, पाराजी पुटेवाड, हरी पतंगे, चंद्रकांत केंद्रे, महिला पोलीस अंमलदार सुरेखा मदने, अंजली गायकवाड तसेच पोलीस ठाणे अहमदपूर येथील पोलीस अंमलदार बी. पी. साळवे व जायभाये यांनी केली आहे.‎बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन होणाऱ्या चोरीच्या घटनांवर आळा घालण्या साठी लातूर पोलीस दल सातत्याने दक्ष आहे. नागरिकांनी प्रवास करताना आपल्या मौल्यवान वस्तूंबाबत विशेष काळजी घ्यावी तसेच संशयास्पद व्यक्ती आढळल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यास माहिती द्यावी, असे आवाहन लातूर पोलिसांकडून करण्यात आले आहे.

error: Content is protected !!