माझी साप्ताहिकी लेख संग्रहाचे शनिवारी प्रकाशन

माझी साप्ताहिकी लेख संग्रहाचे शनिवारी प्रकाशन

लातूर (प्रतिनिधी) : ॲड. प्रभाकर येरोळकर लिखित ‘माझी साप्ताहिकी’ या लेख संग्रहाचा प्रकाशन समारंभ शनिवार दि.१४ ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आला आहे. स्व.ॲड.प्रभाकर येरोळकर यांनी विविध विषयावर लिखाण केले. स्तंभलेखक म्हणून ते प्रसिद्ध होते.विविध विषयांवरील त्यांच्या या लेखांचा ‘माझी साप्ताहिकी’ हा संग्रह चपराक प्रकाशन प्रसिद्ध करत आहे.प्रकाशन समारंभाच्या अध्यक्षस्थानी आदर्श समाजसेवक आणि गांधीवादी विचारवंत डॉ. सोमनाथ रोडे तर विशेष अतिथी म्हणून माजी खासदार व विचारवंत डॉ. जनार्दन वाघमारे आणि पुण्याच्या चपराक प्रकाशनचे संस्थापक घनश्याम पाटील यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. शनिवारी सायंकाळी ५.३० वाजता लातूर येथील अष्टविनायक मंदिराच्या बाजूस असणाऱ्या गणेश हॉल येथे हा कार्यक्रम संपन्न होणार आहे.यावेळी उपस्थित राहण्याचे आवाहन आशा प्रभाकर कुलकर्णी येरोळकर, पद्माकर कुलकर्णी व प्रदीप नणंदकर यांनी केले आहे.

About The Author

error: Content is protected !!