मटका, जुगार व दारूबंदी प्रकरणात एकूण 12 आरोपींवर कारवाई.

0
मटका, जुगार व दारूबंदी प्रकरणात एकूण 12 आरोपींवर कारवाई.

लातूर (एल पी उगिले) : पोलीस दलातील स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस स्टेशन यांनी व्यापक, नियोजनबद्ध व परिणामकारक कारवाई करत विविध पोलीस स्टेशनच्या हद्दीत अवैध जुगार,तसेच दारूबंदी कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात एकाच वेळी छापे टाकून मोठ्या प्रमाणात आरोपींना अटक करण्यात आली आहे. नमूद गुन्ह्यात एकूण 12 आरोपी विरुद्ध कारवाई करण्यात आली असून 51,580/- रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
मटका आणि जुगार कारवाई. (स्थानिक गुन्हे शाखा)

  1. पोलीस स्टेशन गांधी चौक हद्दीत स्थानिक गुन्हे शाखा ने छापा टाकून आरोपी गणेश मन्मथ स्वामी (वय 37 वर्ष राहणार भातांगळी तालुका जिल्हा लातूर) याचे विरुद्ध गुन्हा दाखल करून त्याचे कडून 27540/- रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
  2. पोलीस स्टेशन विवेकानंद चौक हद्दीत स्थानिक गुन्हे शाखा यांनी छापा टाकून आरोपी अभिजीत श्रीकांत कांबळे (राहणार आनंदनगर), अमर वसंत सकट, जयाभाऊ वसंत सकट (दोघे राहणार विलासनगर) ,नासिर कुरेशी (राहणार खाटीक गल्ली) ,मनोज कांबळे (राहणार सिद्धेश्वर चौक) यांचे विरुद्ध गुन्हा दाखल करून आरोपीकडून 22000/- रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
  3. पोलीस स्टेशन विवेकानंद चौक पोलिसांनी त्यांच्या हद्दीत छापा टाकून आरोपी आकाश तुकाराम पवार (वय 32 राहणार साई तालुका जिल्हा लातूर) याचे विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे
  4. पोलीस स्टेशन विवेकानंद चौक पोलिसांनी त्यांचे हद्दीत छापा टाकून आरोपी कालीचरण दिनेश रवी (वय 28 वर्ष राहणार सम्राट चौक मोची गल्ली लातूर) याचे विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
    दारूबंदी कायद्याअंतर्गत खालील पोलीस स्टेशन यांनी कारवाई करून आरोपीविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.1. पोलीस स्टेशन विवेकानंद चौक आरोपी छाया अंबादास धावारे (वय 58 वर्ष राहणार संजय नगर लातूर),2. पोलीस स्टेशन चाकूर आरोपी सचिन विश्वनाथ आलोरे (राहणार वडवळ नागनाथ तालुका चाकूर )3. पोलीस स्टेशन शिरूर अनंतपाळ आरोपी अभंग काशिनाथ कोळपे (राहणार कारेवाडी तालुका शिरूर अनंतपाळ)4. पोलीस स्टेशन औसा आरोपी विकास नागनाथ कांबळे (वय 29 वर्ष राहणार साळे गल्ली लातूर),5. पोलीस स्टेशन किनगाव विष्णू अंतराम सूर्यवंशी (वय 28 वर्ष राहणार झरी तालुका चाकूर)
    लातूर जिल्ह्यात कोणत्याही प्रकारचे अवैध जुगार, सट्टा, बेकायदेशीर मद्यविक्री किंवा समाजविघातक कृत्ये खपवून घेतली जाणार नाहीत. अवैध धंदे करणाऱ्यांविरोधात यापुढेही कठोर, सातत्यपूर्ण व कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा लातूर पोलीस दलामार्फत देण्यात आला आहे. नागरिकांनी अवैध धंद्यांबाबत माहिती असल्यास तात्काळ पोलीस प्रशासनास कळवून सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
    उदगीर शहर आणि ग्रामीण तसेच वाढवणा पोलीस स्टेशन हद्दीतील अवैध धंद्याच्या संदर्भात पोलीस उप महानिरीक्षक यांचे पथक किंवा जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या वशेष पथक
    का लक्ष देत नसेल हा मोठा प्रश्न उदगीर परिसरातील जनतेला पडलेला आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!