समाजसेवेची जाण आणि भान असलेल्या डॉ. दीपक सोमवंशी यांना समाज कल्याण सभापती करा, कार्यकर्त्याची मागणी

0
समाजसेवेची जाण आणि भान असलेल्या डॉ. दीपक सोमवंशी यांना समाज कल्याण सभापती करा, कार्यकर्त्याची मागणी

उदगीर (प्रतिनिधी) उदगीर तालुक्यातील निडेबन जिल्हा परिषद गटातून प्रचंड बहुमत घेऊन विजयी झालेले राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार डॉ. दीपक सोमवंशी यांना जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण सभापती पदी काम करण्याची संधी द्यावी. अशा पद्धतीची मागणी निडेबन जिल्हा परिषद गटातील अनेक गावातील कार्यकर्त्यांनी केली आहे. निवडणुकीच्या दरम्यान उच्च विद्याविभूषित असलेल्या डॉ. दीपक सोमवंशी यांना विजयी करा, या भागाचा निश्चित विकास होईल. अशी शाश्वती आ. संजय भाऊ बनसोडे यांनी दिली होती. या विकासाला गती येण्यासाठी डॉ. दीपक सोमवंशी यांना सभापती पद द्यावे. समाजसेवेची जाण आणि भान असलेले हे नेतृत्व आहे. गोरगरिबांची खऱ्या अर्थाने सेवा करतील, गरिबावर कुठेही अन्याय होऊ देणार नाहीत. अशा पद्धतीचे हे व्यक्तिमत्व असून निस्वार्थ भावनेने आणि निपक्षपातीपणे ते काम करतील. याची खात्री लोकांना आहे. 9200 हून अधिक मते त्यांनी मिळवली आहेत. यावरूनच त्यांची लोकप्रियता लक्षात येते. रुग्णसेवेच्या माध्यमातून त्यांनी आजपर्यंत हजारो लोकांना जीवदान दिले आहे. अनेकांच्या सुखदुखात डॉ. दीपक सोमवंशी हे सहभागी झाले आहेत. ही त्यांची सामाजिक बांधिलकी विचारात घेऊन, त्यांना जर जिल्हा परिषदेमध्ये सभापती पदावर काम करण्याची संधी दिली, तर ते निश्चितच या संधीचे सोने करतील. असा विश्वास कार्यकर्त्यातून व्यक्त केला जात आहे. या संदर्भामध्ये कार्यकर्ते आ. संजय बनसोडे यांची भेट घेणार असून, आपल्या नेत्यासाठी आग्रही मागणी करणार असल्याची चर्चा आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!