अमरावती ! फ्रेजरपुरा पोलीस स्टेशनचे PSI अनिल मुळे यांची गळफास घेवून आत्महत्या !!

अमरावती ! फ्रेजरपुरा पोलीस स्टेशनचे PSI अनिल मुळे यांची गळफास घेवून आत्महत्या !!

अमरावती (प्रतिनिधी) : अमरावतीच्या फ्रेजरपुरा पोलीस स्टेशनचे PSI पदावर कार्यरत पोलीस अधिकारी अनिल मुळे यांची गळफास घेवून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेने फ्रेजरपुरा पोलीस ठाण्यात खळबळ उडाली आहे.
अमरावती शहरात कालच दोन हत्याकांडाची घटना ताजी असतानाच आज पोलीस अधिकारी PSI अनिल मुळे यांच्या आत्महत्येने शहर हादरून गेलंय. अनिल मुळे हे कटोरा नाका,रिंग रोड परिसरात वास्तव्यास होते, त्यांच्या राहत्या घरापासून गोल्डन लिफ मंगल कार्यालया समोरील लेआऊट मधील निंबाच्या झाडाला गळफास घेवून जीवन यात्रा संपविली घेतली.

आत्महत्येच नेमक कारण अजून अस्पष्ट आहे. या प्रकरणी नांदगाव पेठ पोलीस तपास करीत आहेत. अनिल मुळे हे सुरुवातीला गाडगे नगर पोलीस ठाण्यात तर दुसऱ्यांदा राजापेठ पोलीस स्टेशन येथे तर आता फ्रेजरपुरा येथे कार्यरत होते.

About The Author