मनाई आदेश झुगारुन पानटपरी व्यवसायास चालू ठेवणाऱ्यावर गुन्हा दाखल.
उस्मानाबाद (सागर वीर) : चेतन मधुसूदन कदम, रा. येडशी, ता. उस्मानाबाद यांनी दि. 12 ऑगस्ट रोजी 21.45 वा. सु. येडशी येथे चौकातील आपली पानटपरी व्यवसायास चालू ठेउन कोविड- 19 संसर्गाच्या पार्श्वभुमीवर जारी केलेल्या मनाई आदेशांचे उल्लंघन केले. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 188, 269 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.