मटका जुगाराला आळा ! पोलिसांच्या जुगार विरोधी कारवाया गुन्हे दाखल

मटका जुगाराला आळा ! पोलिसांच्या जुगार विरोधी कारवाया गुन्हे दाखल

उस्मानाबाद ( सागर वीर ) : मेहराज शेख, रा. वैराग नाका, उस्मानाबाद हे दि. 10 ऑगस्ट रोजी राहत्या परिसरात कल्याण मटका जुगार चालवण्याचे साहित्य व 1,030 ₹ रोख रक्कम बाळगलेले उस्मानाबाद (श.) पो.ठा. च्या पथकास आढळले. तर अजित व्हनाजे, रा. भुसणी, ता. उमरगा हे दि. 11 ऑगस्ट रोजी गावातील मुरुम रस्त्यावरील चौकात कल्याण मटका जुगार चालवण्याचे साहित्य व 320 ₹ रोख रक्कम बाळगलेले मुरुम पो.ठा. च्या पथकास आढळले. तर अविनाश चेंडके, रा. सोलापूर हे याच दिवशी तामलवाडी येथील एका ढाब्याच्या मागे मुंबई मटका जुगार चालवण्याचे साहित्य व 870 ₹ रोख रक्कम बाळगलेले तामलवाडी पो.ठा. च्या पथकास आढळले. यावरुन पोलीसांनी जुगार साहित्यासह रक्कम जप्त करुन नमूद तीघांविरुध्द महाराष्ट्र जुगार प्रतिबंध कायद्यांतर्गत संबंधीत पो.ठा. येथे गुन्हे नोंदवले आहेत.

About The Author

You may have missed

error: Content is protected !!