मोठी बातमी ! स्थानिक गुन्हे शाखा लातूर कडून सात गुन्हे उघडकीस 12 लाख 50 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत

मोठी बातमी ! स्थानिक गुन्हे शाखा लातूर कडून सात गुन्हे उघडकीस 12 लाख 50 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत

लातूर : या बाबत थोडक्यात हकीकत अशी की, पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी लातूर जिल्ह्यात घडलेल्या मालाविषयक गुन्हे उघडकीस आणण्यात करिता निर्देशित केले होते. त्या अनुषंगाने अप्पर पोलीस अधीक्षक हिंमत जाधव, पोलीस उपाधीक्षक (गृह) श्रीमती प्रिया पाटील यांचे मार्गदर्शनात व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक गजानन भातलवंडे यांचे नेतृत्वात लातूर जिल्ह्यामध्ये घडलेल्या मालाविषयक गुन्ह्याच्या तपासाचे अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखा चे अधिकारी व अंमलदार यांचे स्वतंत्र पथक तयार करून विशेष मोहीम राबविण्यात आली होती.
सदर मोहीम अंतर्गत पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांना वेळोवेळी सूचना व मार्गदर्शन करण्यात आले होते.सदर पथक जिल्ह्यामध्ये घडलेल्या मालाविषयक गुन्ह्याच्या तपासाचे व उघडकीस आणण्याच्या अनुषंगाने प्रयत्न करीत असताना पथकास मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे लातूर जिल्ह्यात विविध ठिकाणी गुन्हे केलेल्या संशयित आरोपींना सदर पथकाने ताब्यात घेऊन त्यांच्याकडे सखोल विचारपूस केली. आरोपीची नावे पुढील प्रमाणे-

1) अक्षय राम तेलंगे ,वय 19 वर्ष ,राहणार ब्राह्मण गल्ली , औसा.

2) साहिल मेहबूब सय्यद, वय 21 वर्ष, राहणार संजय नगर ,औसा.

3) मधुकर आबा काळे, वय 26 वर्ष, राहणार खामकरवाडी, तालुका वाशी जिल्हा उस्मानाबाद

4) भैया आबा काळे ,वय 22 वर्ष ,राहणार खामकरवाडी, तालुका वाशी जिल्हा उस्मानाबाद.

5) रमेश सर्जेराव पवार, वय 26 वर्ष, राहणार-खामकरवाडी , तालुका वाशी जिल्हा उस्मानाबाद.

6) दिलीप शिवराम गायकवाड, वय-26, वर्ष राहणार सायाळ रोड ,लोहा. जिल्हा नांदेड, ह.मु. औसा रोड लातूर.

आरोपी क्रमांक एक व दोन यांनी पोलीस ठाणे विवेकानंद चौक आणि औसा येथील गुन्हे केल्याचे कबूल केले आरोपी क्रमांक 3,4, आणि 5 यांनी पोलीस स्टेशन एमआयडीसी आणि मुरुड येथील गुन्हे केलेले आहेत तर आरोपी क्रमांक 6 याने पोलीस ठाणे लोहा जिल्हा नांदेड येथील गुन्हा केलेला असून  सर्व  गुन्ह्यांमधील एकूण 12,52,000/- रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.
  गुन्ह्यात जप्त केलेल्या मुद्देमालाची  पोलीस ठाणे निहाय माहिती खालील प्रमाणे.

*1) पोलीस ठाणे विवेकानंद चौक*

1) Cr 171/ 2021, कलम 379 भादवि.
   मोटर सायकल 15000 /- जप्त

2) Cr 523/ 2021, कलम 379 भादवि.
    मोटर सायकल 35000/- जप्त

*2) पोलीस स्टेशन औसा*

3) CR.NO 265/2021 कलम 457,380 भादवि
मोटरसायकल व मोबाईल 55000 रुपयांचा मुद्देमाल जप्त .

    *3)पोलीस ठाणे एमआयडीसी*

4).CR NO. 343/2021 कलम 379
भादवि
   ट्रक, टायर असा मिळून एकूण 10,45,000/- रुपयांचा मुद्देमाल जप्त .

   *4)पोलीस ठाणे मुरुड*

5) CR 131/2020, कलम 379भादवि
6) Cr 77/2019 ,कलम 379भादवि
पेट्रोल डिझेल चोरण्याचे साहित्य कॅन पाईप हातपंप 2000 रुपये

*5) पोलीस ठाणे लोहा जिल्हा नांदेड*

7) CR NO. 147/2021 कलम 379 भादवि
   मोटार सायकल 1,00,000/- जप्त.

               याप्रमाणे लातूर जिल्ह्यातील विविध पोलिस स्टेशन व नांदेड जिल्ह्यातील लोहा पोलीस स्टेशन मधील गुन्हे उघडकीस आले असून नमूद गुन्ह्यामध्ये चोरलेला एकूण 12.5 लाख रुपये इतका किमतीचा मुद्देमाल नमूद आरोपीता कडून जप्त करण्यात आला असून त्यांना नमूद गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे.
सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे , अप्पर पोलीस अधीक्षक हिंमत जाधव, पोलीस उपाधीक्षक (गृह) श्रीमती प्रिया पाटील यांचे मार्गदर्शनात व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक गजानन भातलवंडे यांचे नेतृत्वात सपोनि सुधीर सूर्यवंशी, पोलीस उपनिरीक्षक लक्ष्मण कोमवाड, पोलीस अंमलदार राजेंद्र टेकाळे, संजय भोसले ,राम हरी भोसले, प्रकाश भोसले, राजेभाऊ मस्के, हसबे ,राजेभाऊ सूर्यवंशी ,नामदेव पाटील, बंटी गायकवाड, भीष्मानंद साखरे, प्रमोद  तरडे हारुण लोहार, चालक अंमलदार लांडगे यांनी बजावली
                गुन्ह्यांचा पुढील तपास संबंधित पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी व अंमलदार करीत आहेत.

About The Author