मराठवाडा अनुशेष व उजणीच्या पाण्याबाबत माजी आ. कव्हेकरांचा केंद्रिय मंत्री दाणवे व राणे यांच्याशी चर्चा

मराठवाडा अनुशेष व उजणीच्या पाण्याबाबत माजी आ. कव्हेकरांचा केंद्रिय मंत्री दाणवे व राणे यांच्याशी चर्चा

लातूर (प्रतिनिधी) : शासनाने बँकेची मदत घेऊन लघुउद्योगाला प्रोत्साहन द्यावे, मराठवाड्यातील रखडलेला अनुशेष भरून काढावा तसेच उजणीच्या धरणाचे पाणी मराठवाड्याला द्यावे आदी विषयावर केंद्रिय मंत्री नारायण राणे, रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे,केंद्रिय वित्त राज्यमंत्री खा.डॉ.भागवतराव कराड, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याशी सकारत्मक चर्चा करून लातूरच्या विकासामध्ये भर पडावी यासाठी पक्षाच्यावतीने आपण सक्रियपणे योगदान द्यावे. अशी अपेक्षा भाजपा नेते तथा माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर यांनी व्यक्‍त केली.

केंद्रिय सुक्ष्म, लघु व मध्यम उद्योगमंत्री ना. नारायणराव राणे (स्मॉल इंडस्ट्रीज), वित्त राज्यमंत्री डॉ.भागवतराव कराड, रेल्वे राज्यमंत्री ना.रावसाहेब दानवे, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, पंचायतराज राज्यमंत्री ना. कपील पाटील, अल्पसंख्यांक व्यवहार मंत्री ना.मुक्खार अब्बास नक्‍वी, माजी मंत्री खा.सत्यपालसिंहजी व इतर मान्यवरांच्या भेटी घेऊन भाजपा नेेते तथा माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर यांनी दिल्‍ली दौर्‍यात सर्व मान्यवरांची विविष विषयावर चर्चा केली. यामध्ये ना.नारायण राणे यांनी लघुउद्योगामध्ये तरूणांना व महिलांना मोठी संधी आहे. त्यांना प्रोत्साहित करून व याकामी शासनाची व बँकेची मदत घेऊन लघु उद्योगांना प्रोत्साहन द्यावे. अशी अपेक्षा व्यक्‍त केली. तर ना. डॉ. भागवतराव कराड व ना. रावसाहेब दानवे यांच्याबरोबर मराठवाडा अनुशेष व उजणी धरणाचे पाणी मराठवाड्याला आणण्यासंदर्भात सविस्तर चर्चा झाली. एकंदर सर्वच विषयावरील चर्चेला मंत्री महोदयांनी चांगला प्रतिसाद दिला असून मराठवाडा अनुशेष व उजणीच्या धरणातील पाणी मराठवाड्याला सकारात्मक चर्चा झाली असून लातूरच्या चौफेर विकासासाठी हे विषय तात्काळ मार्गी लागावेत अशी अपेक्षाही भाजपा नेते तथा माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर यांनी यावेळी बोलताना व्यक्‍त केली.

About The Author