शिक्षण देणारी व जीवन घडविणारी तांबाळ्याची उत्कृष्ट जि.प.शाळा आमदार अभिमन्यू पवार

शिक्षण देणारी व जीवन घडविणारी तांबाळ्याची उत्कृष्ट जि.प.शाळा आमदार अभिमन्यू पवार

तांबाळा जि.प.शाळेबद्दल काढले गौरवोद्गार
निलंगा (भगवान जाधव) : तालुक्यातील तांबाळा गावची शाळा ही लातूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल यांच्या संकल्पनेतून लातूर जिल्ह्यातील ५०० शाळांत ‘बाला उपक्रम’ राबविला जात आहे.हाच ‘बाला उपक्रम’ निलंगा तालुक्यात गट विकास अधिकारी अमोल ताकभाते यांच्या मार्गदर्शनाखाली व गट शिक्षणाधिकारी संतोष स्वामी यांच्या अथक परिश्रमातून तालुक्यातील साठ शाळांत राबविला जात आहे.या बाला उपक्रमांमुळे अनेक शाळांचे रुपडे बदलले आहे. असाच अविश्वसनीय बदल निलंगा तालुक्यातील तांबाळा येथील जिल्हा परिषद शाळेत झालेला आहे.ही बदलेली शाळा पाहण्यासाठी औसा विधानसभा मतदार संघाचे आमदार अभिमन्यू पवार हे तांबाळा येथील जिल्हा परिषद शाळेत आले होते. सभापती राधाताई बिराजदार, सुरेशराव बिराजदार वअमृत तुमकुटे यांनी अभिमन्यू पवार साहेबांचे स्वागत केले. शाळेचे मुख्याध्यापक दयानंद मठपती यांनी, बाला-इमारत एक शैक्षणिक साधन ही संकल्पना काय आहे ती स्पष्ट केली. त्याच बरोबर अंक अक्षर उद्यान, पासवर्ड-सुंदर हस्ताक्षराचा, लपंडाव भिंत, कोनमापक, माझी उंची, रेन वाॕटर हार्वेस्टिंग अशा अठ्ठावीस बाबी, शेततळे, पाॕली हाऊस, शून्य कचरा, सलग समतल चर, विचार दालन, आपला परिसर, हॕंगिंग गार्डन अशा अनेक नाविण्यपूर्ण उपक्रमांची माहिती सांगितली.इतके नाविण्यपूर्ण व जीवन शिक्षण देणारे उपक्रम शाळेत राबविले जातात हे ऐकून आमदार अभिमन्यू पवार आश्चर्यचकित झाले. आपल्या मनोगतात ते म्हणाले,मुख्याध्यापक दयानंद मठपती यांनी मला शाळेतील सर्व उपक्रमांची माहिती मला दिली. सर्व नाविण्यपूर्ण उपक्रमांचं फलित ऐकून व जाणून मी थक्क झालो.शाश्वत जीवन शिक्षण देणारी ही शाळा आहे.या सर्व उपक्रमांमुळे मुलांचा सर्वांगीण विकास साधला जाणार आहे. अशी शाळा मिळाली नाही अशी खंत त्यांनी व्यक्त केली. बाला उपक्रमामुळे जिल्हा परिषद शाळेचा पट वाढण्यास नक्कीच मदत होईल असे ते म्हणाले. निलंग्याचे गट विकास अधिकारी अमोल ताकभाते, गट शिक्षणाधिकारी संतोष स्वामी, केंद्र प्रमुख दिगंबर माचेवाड, शाळेचे मुख्याध्यापक दयानंद मठपती व सर्व शिक्षकांचे अभिनंदन केले.

About The Author