विलासरावजी जगा, विलासरावजी जागवा..

विलासरावजी जगा, विलासरावजी जागवा..

संजय जेवरीकर ( जेष्ठ पत्रकार ) : महाराष्ट्राचे लोकनेते विलासराव देशमुख यांची आज पुण्यतिथी..१४ ऑगस्ट आमच्या लातूरसाठी काळरात्र ठरली..माझ्यावर प्रेम करणाऱ्या माणसाच्या चेहऱ्यावर मला दुःख पाहायचं नाही म्हणून आपला आजार सार्वजनिक न करणाऱ्या या लोकनेत्याने १४ऑगस्ट रोजी अखेरचा श्वास घेतला..महाराष्ट्रातला एक रुबाबदार नेता आमच्यातून गेला..मागच्या नऊ वर्षात असा एकही दिवस गेला नाही जिथे विलासराव देशमुखांची आठवण निघाली नाही..महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात कुठेही जा,लातूर म्हटले की विलासरावांच्या लातूरचे का?हा प्रश्न आल्याशिवाय राहत नाही..तुम्ही किती नशीबवान आहात ज्यामुळे तुम्हाला असा दिलदार नेता भेटला हे दुसरे वाक्य उत्स्फूर्तपणे लोकांच्या तोंडात येते..हा माणूस जगला दिलदारपणे,विरोधकांनाही टीका करताना विचार करावा लागावे असे व्यक्तिमत्व म्हणजे विलासराव देशमुख..कधीच थकायचे नाही सतत चेहऱयावर आनंद आणि एक प्रचंड उर्जाशक्तीचे स्त्रोत..कामाचा प्रचंड झपाटा,शंभर शंभर सभांचा मानकरी,अधिकाऱ्यांवर एक वेगळी छाप,राहण्यात,वागण्यात रुबाबदारपणा, साहित्यिक,कलाकाराच्या सानिध्यात हास्य पेरणारा,विरोधकांच्या व्यसपीठवरही त्यांनी दमछाक करणारा,हजरजबाबी असणारा नेता आता होणे नाही..
आज अश्या नेत्याची महाराष्ट्राला गरज आहे.विरोधकांच्या बोचऱ्या टीकाही ते हसत हसत उडवून लावायचे,अनेक खात्यांचा अभ्यास असण्याने अधिकारी कोण कुठे आहेत याची जाण त्यांना असल्याने ते सरळ फोन लावून हे काम करून टाका असा सहज शब्द टाकून आपले काम करून घ्यायचे..आता नेत्यांना मिळालेल्या खात्यात काय करायचे हे समजेपर्यंत खाते निघून गेलेले असते..
आज महाराष्ट्राचे राजकारण उथळ झालेले आहे.हुशार,बुद्धिमान नेत्यापेक्षा आरोप प्रत्यारोपात धन्यता मानली जात आहे.टीका ही वैयक्तीक पातळीवर करण्याची स्पर्धा लागली आहे..सत्ता ही आपली जहांगीर आहे,त्यासाठी काहीही करण्याची तयारी सुरू आहे..अश्या परिस्थितीत विलासराव देशमुख यांची आठवण आल्याशिवाय राहत नाही..सत्ता कुणाचीही असो तिथे सामान्यांची कामे झाली पाहिजेत असा विचार करणारे सुसंस्कृत नेते तयार व्हायला पाहिजेत..राजकारणापूरते राजकारण पुन्हा समाजकारण करण्यासाठी विधानसभेचे पावित्र्य जपायला हवे ही भावना असणारे निर्माण व्हायला हवेत..आज कार्यकर्ता तसा राहिला नाही आणि नेतेही तसे राहिले नाहीत..इन्स्टंट कुक मॅगी सारखी राजकारणाची अवस्था झाली आहे..
विलासरावजी राजकारणात जगले त्याच तत्वाने,त्यांच्या गाड्याचा ताफा निघाला की अनेकजण नुसते पाहत राहायचे..दौरा आला की प्रत्येक विभागाचे अधिकारी सोबत असायचे,तिथल्या तिथे प्रश्नांचा निपटारा व्हायचा..अनेकदा विलासराव देशमुख यांच्यासोबत दौऱ्यात फिरण्याचा योग आला,त्यांच्यात प्रश्नांची असलेली समज प्रचंड होती,कोणते काम,कोणत्या अधिकाऱ्यांना सांगितले तर होऊ शकते हे सोबतच सचिवाला ते सांगत असत आणि कामाचा निपटारा करत असत..
आज महाराष्ट्रात विलासराव देशमुख यांचा विचार पुन्हा एकदा सामान्य कार्यकर्त्यापर्यंत पोचवण्याची गरज आहे..नेत्यांना त्यांच्या विचाराचे पाठ देऊन समाजकारण,राजकारण कसे करायचे याचे वस्तुपाठ देण्याची गरज आहे..ते म्हणायचे मी सायकलवरचा कार्यकर्ता मोटरसायकलवर आणला,मोटार सायकलचा जीपमध्ये आणि जीपमधला कारमध्ये आणला..आता फक्त कारमध्ये फिरणारे कार्यकते केवळ स्वतःच्या स्वार्थासाठी नेत्यांच्या पाठीमागे फिरताना दिसत आहेत..साहेबाना मी काही मागितले तर त्यांना काय वाटेल?अशी भावना तेव्हा कार्यकर्त्यांत होती,आता पहिले स्वतःसाठी मग समाजासाठी इतका बदल झालेला दिसत आहे..खरं तर विलासराव देशमुख यांच्याकडे पाहत नेत्यांनी जगलं पाहिजे आणि त्यांचे विचार जागवले तरच त्यांना खरी भावांजली ठरेल..

संजय जेवरीकर यांच्या फेसबुक पोस्ट वरुन..!

About The Author