महाआरोग्य शिबीरामुळे सर्वसामन्य रुग्णांना लाभ – जिल्हा पोलिस अधिक्षक निखील पिंगळे
लातूर (प्रतिनिधी) : मागील नऊ वर्षापासुन लातुर मध्ये लोकनेते कै विलासराव देशमुख साहेब यांच्या पुण्यतिथी निमीत्त गायत्री हाॅसपीटल लातुर तर्फे ह्रदयरोग, दमा, छातीविकार व श्वसन विकार या आजारांवर मोफत ऊपचार शिबीर आयोजित करण्यात येते. यावेळी पण हे शिबीर आयोजित करण्यात आले होते. या वेळी या शिबीराचे उद्घाटन जिल्हा पोलिस अधिक्षक निखील पिंगळे यांचे हस्ते करण्यात आले. या वेळी त्यांनी डाॅ रमेश भराटे हे त्यांच्या रुग्ण सेवेमध्ये व्यस्त असताना सामाजिक बांधिलकी ठेवून समाजातील गोरगरीब रुग्णांची सेवा करत असल्याबद्दल गौरवोदगार काढले. या वेळी माजी आमदार त्र्यंबक नाना भिसे यांनी डाॅ भराटे हे निष्णात श्वसन विकार तज्ञ म्हणुन मागील वीस वर्षापासुन पुण्यामुंबई च्या तोडीस तोड सेवा देत असुन आम्हाला त्यांचा सार्थ अभिमान असल्याचे नमुद केले.या वेळी प्रमुख पाहुणे म्हणुन महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक चे सदष्य डाॅ डी एन चिंते, यशवंत पाटील कामखेडकर, डाॅ लक्ष्मिकांत येणगे यांची ऊपस्थिती होती.या वेळी कोरोना योद्धा म्हणुन डाॅ शिवप्रसाद मुंदडा, डाॅ संजय गटकुळ, डाॅ जावेद सौदागर, डाॅ विशाल गरड,डाॅ हलकंचे, डाॅ प्रतिक बंडगर व ईतर कर्मचारी यांचा प्रशस्तिपत्र देवुन सन्मान करण्यात आला. या शिबीराध्ये कोरोना चे नियम पाळुन १०० रुग्णांची तपासणी व ऊपचार करण्यात आले. या वेळी २०० रुग्णांना मोफत कोवीड लस देण्यात आली. या शिबीरा मधील १० रुग्णांची व्हिडीओ ब्रॅांकोस्कोपी व व्हिडीओ असिस्टेड थोरॅकोस्कोपी करणार असल्याचे प्रसिद्ध छातीविकार व श्वसनविकार तज्ञ डाॅ रमेश भराटे यांनी नमुद केले. हे शिबीर यशस्वी करण्यासाठी श्री चाटे,श्री राजेश शेळके व पवळे सर्व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. या ऊपकृमाचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.