ऍड. एस एस पाटील यांच्या प्रथम स्मृती दिनानिमित्त आलमला येथे रक्तदान व नेत्र तपासणी शिबिर
आलमला : येथील समस्त ग्रामस्थ व लातूर ब्लड बँकेच्या वतीने दिनांक १५ ऑगस्ट २०२१ रोजी आलमला येथे रक्तदान शिबिर व १६ ऑगस्ट २०२१ रोजी नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर आयोजित केले आहे. रक्तदान शिबिराचे उद्घाटन माननीय श्री एस यु पटवारी साहेब पोलीस निरीक्षक, औसा यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून श्री महादेव कुंभार वृत्तसंपादक दैनिक पुण्यनगरी व प्रमुख अतिथी म्हणून डॉक्टर अमोल जगताप लातूर ब्लड बँक या मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे. नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे दिनांक १६ ऑगस्ट रोजी मा. श्री अविनाश कांबळे उप विभागीय अधिकारी औसा यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष सौ अर्चना गायकवाड पं.स. सभापती औसा, प्रमुख अतिथी डॉ स्वप्नील शिंदे या मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे दोन्हीही शिबिरे ऍड एस एस पाटील समाधीस्थळ, आलमला येथे होणार आहेत. दोन्हीही शिबिराचे उद्धाटन सकाळी दहा वाजता होणार आहे. तरी जास्तीत जास्त युवकांनी रक्तदान करण्यासाठी आपला सहभाग नोंदवावा व डोळ्याचे आजार असणाऱ्यांनी आपले डोळे तपासणी करून घ्यावे असे आवाहन संयोजन समितीने केले आहे.