चाकूरच्या नगरपंचायत प्रशासनाचे शहर राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीने सत्कार
विविध आंदोलनाची दखल घेऊन प्रश्न मार्गी लावल्याबद्दल करण्यात आला सत्कार
चाकूर (सुनिल जाधव) : भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पार्टीचे चाकुर तालुका अध्यक्ष विलासराव पाटील चाकूरकर यांच्या सूचनेप्रमाणे शहरातील विविध समस्या बद्दल निवेदन देऊन आंदोलन करण्यात आले होते याच निवेदनाची आंदोलनाची दखल घेत चाकुर नगरपंचायत प्रशासनाने वेळेतच प्रश्न मार्गी लावल्याबद्दल आज नगरपंचायत प्रशासनाचे शहर राष्ट्रीय काँग्रेस पार्टीच्या वतीने जाहीर सत्कार करण्यात आला. नगरपंचायत वर सध्या प्रशासक नियुक्त असल्यामुळे चाकूर-अहमदपूरचे उपजिल्हाधिकारी नगरपंचायत प्रशासक म्हणून प्रमोदय मुळे आणि मुख्याधिकारी अजिंक्य रणदिवे या दोन्ही अधिकारी यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.शहरातील नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत असल्याने चाकूर शहर काँग्रेसच्या वतीने निवेदन देऊन व आंदोलन करून शहरातील समस्यावर लवकरात लवकर तोडगा काढावा या खूप काही मागणीसाठी शहर राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्यावतीने सांगितले गेले होते तरी हे प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावल्याबद्दल हा सत्कार करण्यात आला,यावेळी शहरातील घाणीचे साम्राज्य झाल्यामुळे डासांचे प्रमाण वाढले आहे या डासांच्या वाढत्या प्रमाणामुळे डेंगू चिकनगुनिया अशा साथीच्या रोगाने लहान मुलांमध्ये रोगराईचे प्रमाण वाढले आहेत त्यामुळे शहरात धूर फवारणी करण्यात आली, शहरात काही ठिकाणी पाऊस पडल्यामुळे ज्या ठिकाणी चिखल झाले आहे त्या ठिकाणी मुरूम टाकून घेतले आहेत आणि शहरात विजेचा लपंडाव हे सारखे चालू होते तरी विद्युत महावितरण कार्यालयाला निवेदन देऊन वेळेमध्ये रोहत्री दुरुस्ती करून विद्युत पुरवठा सुरळीत करण्यात आला. चाकूर शहरातील उजळंब रोडलगतच्या नाल्या हे तुडूंब भरून रस्ते शेजारील घरामध्ये घाण पाणी जात होते त्या ठिकाणच्या नाल्या साफसफाई करून तेथील नाली स्वच्छ करण्यात आले. या सर्व मागण्यांचे निवेदन देऊन वेळेत नगरपंचायत प्रशासनाने काम केल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी चाकूर शहर राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष पप्पूभाई शेख, भागवत फुले,गंगाधर केराळे, सिताराम मोठेराव,सलीम भाई तांबोळी,बाळू इरवाने, विजय धनेश्वर,नितीन पाटील,बाबूराव शेटे,प्रकाश पटणे,अनिल महालिंगे,गफूर मासूलदार,सुनील शिंदे, आनंद झांबरे,सचिन चाकूरकर,शंकर मोरे,बबलू झांबरे,कैलास मोठेराव इत्यादी शहर राष्ट्रीय काँग्रेस पार्टीचे कार्यकर्ते उपस्थित होते.