जोपर्यंत आरक्षण नाही तोपर्यंत निवडणूका नाहीत
ओबीसी समाज भोळा त्यालाही तिसरा डोळा
लातूर येथील ओबीसी महामेळाव्यात भाजपा नेत्या पंकजाताई मुंडे यांचे प्रतिपादन
लातूर (प्रतिनिधी) : लोकनेते स्व. गोपीनाथराव मुंडे साहेबांनी आयुष्यभर वंचितांना न्याय देण्यासाठी सतत संघर्ष केला. त्यांच्या विचाराचा आणि संघर्षाचा वारसा पुढे घेवून जात आहे. जनसेवेचे पदरात टाकलेले वाण मी कधीच सोडणार नाही. ओबीसी समाज भोळा आहे पण त्यालाही तिसरा डोळा आहे. जोपर्यंत हक्काचे आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत या राज्यात कोणत्याच निवडणूका होवू देणार नाही असे प्रतिपादन भाजपाच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई गोपीनाथराव मुंडे यांनी लातूर येथील ओबीसी भटक्या विमुक्त जातीच्या महाजागर महामेळाव्यात बोलताना केले.
ओबीसी आणि भटक्या विमुक्त समाजाचे रद्द झालेले आरक्षण सन्मानाने परत मिळावे यासाठी त्याचबरोबर आरक्षणाबाबत जनजागृती व्हावी याकरीता जिल्हा भारतीय जनता पार्टीच्या वतीने लातूर येथील गिरवलकर मंगल कार्यालयात शनिवारी महाजागर महामेळावा झाला. या मेळाव्याचे उद्घाटन पंकजाताई मुंडे यांच्या हस्ते झाले त्याप्रसंगी बोलत होत्या. मेळाव्या अध्यक्षस्थानी भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ. रमेशअप्पा कराड हे होते. तर माजी मंत्री राम शिंदे, माजी पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर, भाजपा ओबीसी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष योगेश टिळेकर, भटक्या विमुक्त मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष नरेंद्र पवार, अनुसूचित जाती मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष सुधाकर भालेराव, खा. सुधाकर शृंगारे, आ. अभिमन्यु पवार, गोविंदअण्णा केंद्रे, प्रदेश भाजपाचे अरविंद पाटील निलंगेकर, विनायकराव पाटील, गणेशदादा हाके, दिलीपराव देशमुख, माजी आमदार पाशा पटेल, बब्रूवान खंदाडे, जिप अध्यक्ष राहूल केंद्रे, उपाध्यक्षा भारतबाई साळूंके, सभापती रोहीदास वाघमारे, ज्योती राठोड, शहर जिल्हाध्यक्ष गुरूनाथ मगे, ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष बापूराव राठोड, जिल्हा भाजपाचे संजय दोरवे, किरण उटगे, रामचंद्र तिरूके, अशोक केंद्रे, त्र्यंबक गुटे, गोविंद चिलकुरे, प्रेरणा होनराव, रेखाताई तरडे, मनिष बंडेवार, अमोल पाटील, मिलींद लातूरे यांच्यासह अनेकांची व्यासपिठावर उपस्थिती होती. या महामेळाव्यास ओबीसी समाज बांधव हजारोंच्या संखेनी उपस्थित होते.
गोरगरीब, कष्टकरी, वंचित, दिनदलितांना न्याय देण्यासाठी सतत काम केल्याने आजही अनेकांच्या मनात मुंडे साहेबांचे आदराचे स्थान कायम आहे. हे स्थान कधीही खाली जावू नये यासाठी मी काम करीत असून वंचिताच्या न्याय हक्कासाठी लढते आहे. ओबीसीच्या आरक्षणासाठी वाटेल तो संघर्ष करण्याची माझी तयारी आहे. शेवटपर्यंत हा लढा लढणार आणि रद्द झालेले आरक्षण परत मिळाल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही असे सांगून पंकजाताई मुंडे म्हणाल्या की, भाजपाच्या वतीने केलेल्या चक्काजाम आंदोलनाची दखल घेवून सरकारला जाहिर केलेल्या निवडणूका पुढे ढकलाव्या लागल्या.
समाजात असलेला मागासलेपणा घालवून मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आरक्षणाची गरज आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे ही मुंडे साहेबांनी सर्वप्रथम भूमिका मांडली. मराठा आरक्षणाच्या विरोधात असन्याचे काही कारण नाही. परळीच्या मराठा क्रांती मोर्चात सहभागी होवून जाहिर पाठींबा दिला होता याची आठवण यावेळी पंकजाताई यांनी करून दिली. ओबीसीचे नुसते मेळावे घेवून चालणार नाही त्यातून काहीतरी सिध्द झाले पाहिजे. येणाऱ्या काळात या प्रश्नावर समाजाने संघटीत शक्तीद्वारे संघर्षाला तयार असले पाहिजे असे आवाहन केले.
पराभवाचे शल्य घेवून जगणारा नवा इतिहास घडवू शकत नाही. मला कुठले पद असले काय नसले काय काहीही फरक पडत नाही माझ्या नावासमोर गोपीनाथ मुंडे हेच नाव माझ्यासाठी खुप मोठे आहे. सर्वसामान्यांना ताकद देण्यासाठी मुंडे साहेबांचा वारसा उतणार नाही मातणार नाही घेतला वसा टाकणार नाही असेही पंकजाताई मुंडे यांनी बोलून दाखविले.
नैसर्गिक संकट समजू शकतो मात्र मानव निर्मीत अनेक संकटे ठाकरे सरकारने निर्माण केली आहेत. विश्वासघाताने सत्तेवर आलेल्या या सरकारने मराठा समाजाबरोबरच ओबीसी समाजाचे आरक्षण घालवले. घटनेने दिलेले आरक्षण काढून घेण्याचा कोणालाच अधिकार नाही असे सांगून यावेळी बोलताना माजी मंत्री राम शिंदे म्हणाले की, ज्यांनी आरक्षण काढून घेतले त्या ठाकरे सरकारला सत्तेवरून खाली खेचण्याचे काम ओबीसी समाज केल्याशिवाय राहणार नाही. गोपीनाथराव मुंडे साहेबांनी स्वाभिमानाने जगण्याचा आणि संघर्ष करण्याची शिकवन आम्हाला दिली आहे. लातूरच्या ओबीसी आरक्षण महामेळाव्याची ठिणगी राज्यात पसरल्याशिवाय राहणार नाही. कोरोनाच्या कृपा आशिर्वादाने टिकलेले हे सरकार जास्त काळ चालणार नाही असे बोलून आ. रमेशअप्पा कराड यांनी लातूरात घेतलेल्या महामेळाव्याचे कौतूक केले.
ओबीसी समाजाला गोपीनाथराव मुंडे साहेबांनी न्याय दिल्यामुळे पंकजाताईकडे आज समाज मोठया अपेक्षेने पाहत आहे. ताई आम्ही तुमच्या पाठीशी ताकतीने उभे आहोत असे सांगून यावेळी बोलताना संभाजीराव पाटील निलंगेकर म्हणाले की, पंकजाताई मुंडे, राम शिंदे यांचा पराभव हा त्यांचा नव्हता तर भविष्यात ओबीसीचे नेतृत्व उभे राहता कामा नये याच आकस बुध्दीतून करण्यात आला. ओबीसी समाजाबरोबरच मराठा समाजालाही आरक्षण मिळाले पाहिजे ही भाजपाची भूमिका आहे. ओबीसीच्या आरक्षण प्रश्नी लातूरच्या पालकमंत्र्यांनी कॅबीनेटच्या बैठकीत कधीच तोंड उघडले नाही. त्यांचे खायचे दात वेगळे आणि दाखवाचे वेगळे आहेत. कोरोनाच्या काळात ऑक्सीजन, बेड, औषधा अभावी अनेकांना आपला जीव गमवावा लागला त्या काळात पालकमंत्री कुठे होते असा प्रश्न उपस्थित केला.
लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब आज असते तर ओबीसी समाजाच्या हक्काचे राजकीय आरक्षण हिसकावून घेण्याची हिंमत कोणी केली नसती. समाजाला मुंडे साहेबांनी दिलेला आवाज दाबण्याचे काम ठाकरे सरकार करीत आहे. असे सांगून भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ. रमेशअप्पा कराड म्हणाले की, न्यायालयात योग्य वसुली सरकारने बाजू मांडणी नसल्याने मराठा समाजाचे आरक्षण गेले. मराठा आरक्षणाचे पाप झाकण्यासाठी ओबीसीचे आरक्षण घालविले. आरक्षण रद्द झाल्याने येणाऱ्या काळात होणाऱ्या विविध स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूकीत ओबीसी दिसनार नाहीत. त्यामुळे जोपर्यंत आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत संघर्ष चालूच राहील असे सांगून येत्या नोव्हेंबर डिसेंबर मध्ये एक लाख ओबीसी बांधवाचा लातूरात महामेळावा घेण्यात येईल असे घोषित केले.
गेल्या २६ जून रोजी लातूरात झालेले चक्काजाम आंदोलन राज्यात प्रभावी ठरले. तर आजचा ओबीसींचा महामेळावा अभूतपुर्व यशस्वी झाल्याबद्दल आ. रमेशअप्पा कराड यांचे जाहिर अभिनंदन करून ओबीसी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष योगेश टिळेकर म्हणाले की, ओबीसी समाजाला भाजपाने वेळोवेळी सन्मान दिला. राज्यातील विश्वासघातकी, लबाड आणि भामटया ठाकरे सरकारच्या कार्यकाळात कोणीच समाधानी नाही. ओबीसी समाजाचे हक्काचे आरक्षण जोपर्यंत मिळणार नाही तोपर्यंत भाजपा ओबीसी मोर्चाचा संघर्ष चालूच राहिल. वाडी वस्तीत राहणारा भटक्या विमुक्त समाजाची भटकंती आजही थांबली नाही. अनेक समस्यांना तोंड देवून जीवन जगणाऱ्या या भटक्या विमुक्तांना न्याय मिळाला पाहिजे. आरक्षण कोणाच्या बापाचे नाही ते आमच्या हक्काचे आहे ते आम्ही मिळवूनच घेणार असे भाजपा भटक्या विमुक्त आघाडीचे प्रदेशाध्यक्ष नरेंद्र पवार यांनी बोलून दाखविले.
या मेळाव्यात भाजपाचे प्रदेश प्रवक्ते गणेशदादा हाके, खा. सुधाकर शृंगारे, आ. अभिमन्यू पवार, माजी आमदार बब्रूवान खंदाडे, भाजपाचे जिल्हा सरचिटणीस संजय दोरवे, किरण उटगे, रामचंद्र तिरूके, प्रा. पंडीत सुर्यवंशी यांनी आपले मनोगत व्यक्त केले. प्रारंभी ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष बापूराव राठोड यांनी प्रास्ताविक केले तर मेळाव्याचे सुत्रसंचलन चंद्रकांत कातळे, शैलेश गोजमगुंडे यांनी केले तर शेवटी गोविंद चिलकुरे यांनी उपस्थितांचे आभार मानले. उपस्थित सर्व प्रमुख मान्यवरांचे जिल्हा भाजपाच्या वतीने फेटा बांधून घोंगडी काठी देवून पुष्पहाराने स्वागत करण्यात आले.
याप्रसंगी ज्ञानेश्वर चेवले, साहेबराव मुळे, प्रा. विजय क्षिरसागर, विजय काळे, देवा गडदे, गोरोबा गाडेकर, देवीदास काळे, बाबासाहेब घुले, दिलीप धोत्रे, भागवत सोट, सतिष अंबेकर, वसंतराव डिगोळे, सुरेश राठोड, वसंत करमुडे, सुरेंद्र गोडभरले, अनिल भिसे, गोविंद नरहारे, रमेश सोनवणे, बस्वराज रोडगे, बाबु खंदाडे, बन्सी भिसे, दशरथ सरवदे, प्रशांत पाटील, हणमंत देवकते, शिवाजी बैनगिरे, ज्ञानेश्वर वाकडे, रवि सुडे, अरविंद नागरगोजे, बालाजी गवारे, पृथ्वीसिंह बायस, सुनिल मलवाड, शिवसिंह सिसोदिया, महादेव कानगुले, अजय भूमकर, अनिल पतंगे, काशिनाथ ढगे, बालाजी गवारे यांच्यासह भाजपाचे लोकप्रतिनीधी, ओबीसी आणि भटक्या विमुक्त समाजातील समाजबांधव हजारोंच्या संखेनी उपस्थित होते.