सर्वसामान्य नागरिकांना शासकीय आरोग्याच्या योजनांचा लाभ द्या -जि प सदस्य तथा भाजपचे गटनेते रामभाऊ तिरुके
उदगीर (प्रतिनिधी) तालुक्यातील
हंडरगुळी येथे संयुक्त आरोग्य बैठकीत रुग्णसेवेला प्राधान्य देण्याचा निर्धार करण्यात आला. सर्वसामान्य नागरिकांना आरोग्याच्या विविध योजनांचा लाभ मिळाला पाहिजे यासाठी प्रशासनातील जबाबदार अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी पुढाकार घेणे गरजेचे आहे असे विचार आरोग्य दूध म्हणून ख्यातनाम असलेले जिल्हा परिषद सदस्य तथा भारतीय जनता पक्षाचे गटनेते रामभाऊ तिरुके यांनी मार्गदर्शन करताना सांगितले.
हंडरगुळी येथे संपन्न झालेल्या आरोग्य शिबिरात व्यक्त करण्यात आला. उदगीर तालुक्यातील हंडरगुळी प्राथमिक आरोग्य केंद्र व वाढवणा प्राथमिक आरोग्य केंद्राची संयुक्त बैठक जि प सदस्य तथा भाजपचे गटनेते रामभाऊ तिरुके यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली.
या बैठकीस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जि. प. गटनेते दिलीपकुमार मटके, लोहारा जि. प. सदस्य मुकेश भालेराव, उदगीर पंचायत समितीचे उपसभापती बापूसाहेब (विकी) पाटील, पं.स. सदस्य सौ. सुरेखाताई सर्जेराव भांगे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष बालाजी भोसले पाटील, माजी जि.प. सदस्य उत्तमराव देशमुख, दयानंद कांबळे, सरपंच विजय आंबेकर, चेअरमन संग्रामजी भोसले, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सचिन राठोड, वैद्यकीय अधिकारी डॉ. हरेश्वर सुळे,सुदर्शन माने, राजकुमार पाटील यांच्यासह सर्व वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी, आशा कार्यकर्त्या व पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बैठकीत वैद्यकीय सेवा सामान्य नागरिकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचल्या पाहिजेत, यावर विशेष भर देण्यात आला. रुग्णसेवा हीच सर्वोच्च प्राधान्य असल्याचे अधोरेखित करत सर्व वैद्यकीय यंत्रणांनी अधिक संवेदनशीलतेने व तत्परतेने काम करावे असे आवाहन करण्यात आले.
